मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'पुण्यात कडक निर्बंध लावणे हा काळा दिवस'; त्रस्त रेस्टॉरंट व्यावसायिकांचा विरोध

'पुण्यात कडक निर्बंध लावणे हा काळा दिवस'; त्रस्त रेस्टॉरंट व्यावसायिकांचा विरोध

Pune Mini Lockdown : पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. याअंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 2 एप्रिल : पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. याअंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ आहे, असे सांगत युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन या रेस्टॉरंट असोसिएशनने या निर्बंधांना विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (black day with strict restrictions in Pune Opposition from restaurants )

याविषयी बोलताना असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले की, गेल्या वर्षभरात लॉकडाऊनचा परिणाम म्हणून शहरातील 40 टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी सध्या सुरू आहेत त्यांचा 50% सुद्धा व्यवसाय होत नाही. अशा परिस्थितीत आणखी 7 दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा जाचक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या बैठकीत लागलेल्या निर्बंधांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. इतर व्यापार, भाजीमंडई, दुकाने सुरू असताना हॉटेल व रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय करण्यासारखे आहे. (black day with strict restrictions in Pune Opposition from restaurants)

हे ही वाचा-Pune Lockdown: पुण्यात PMP सह हॉटेल, मॉल 7 दिवसांसाठी बंद; नवे नियम जारी

कोरोनाची वर्षभरातील परिस्थितीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन संपला तरी आमच्यावर लागलेले निर्बंध मात्र कायम राहिले इतकेच नाही तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करीत राहिलो. आता मात्र या क्षेत्राला टिकून राहणे देखील शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

First published:

Tags: Corona spread, Lockdown, Pune