मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune Lockdown Breaking News: पुण्यात PMP सह हॉटेल, मॉल 7 दिवसांसाठी बंद; शहरात नवी नियमावली जाहीर

Pune Lockdown Breaking News: पुण्यात PMP सह हॉटेल, मॉल 7 दिवसांसाठी बंद; शहरात नवी नियमावली जाहीर

Pune Lockdown News: दोन आठवड्यांसाठी पुणे शहरातील सर्व हॉटेल आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Lockdown News: दोन आठवड्यांसाठी पुणे शहरातील सर्व हॉटेल आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Lockdown News: दोन आठवड्यांसाठी पुणे शहरातील सर्व हॉटेल आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे, 2 एप्रिल : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरात लॉकडाऊन (Lockdown) न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी विविध निर्बंध (New Restrictions in Pune City) लादण्यात आले आहेत. 7 दिवसांसाठी पुणे शहरातील सर्व हॉटेल आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गर्दी टाळण्यासाटी पीएमपी बस (PMP Bus) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला पुणे शहराचे खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांचा विरोध होता. मात्र शहरात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला. उद्यापासून नवे सर्व निर्णय लागू होणार आहेत.

पुण्यात काय सुरू, काय बंद; जाणून घ्या नवे नियम :

- शाळा कॉलेज 30 एप्रिलपर्यंत बंद

- दहावी बारावीच्या नियोजित परीक्षा होणार

- हॉटेल मॉल दोन आठवड्यांसाठी बंद, पण होम डिलिव्हरी सुरू राहील

- ससून रुग्णालय क्षमता 500 बेडने वाढवणार

- सर्व धार्मिक स्थळ 7 दिवस बंद राहणार

- औद्योगिक कंपन्या सुरू राहतील

- आठवडे बाजार बंद

लॉकडाऊनबाबत अजित पवारांची काय आहे भूमिका?

'पुण्यात लॉकडाऊन करू नये, अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात येणार नाही. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येणार आहेत,' अशी भूमिका अजित पवार यांनी या बैठकीत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात चिंताजनक स्थिती

पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दिवसाला 4 हजारांहून अधिक बधितांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. डब्लिंग रेट सुद्धा 49 दिवसांवर आला आहे. तर मृत्यू दर 1.95 टक्क्यांवर आहे. शहरात 35 हजार 849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच बरे होण्याचं प्रमाण 85 टक्क्यांवर आले आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Pune