जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / मुंबईत कोरोनाची तिसरी लाट कधी गाठणार उच्चांक? रुग्णसंख्येबाबतही IIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट कधी गाठणार उच्चांक? रुग्णसंख्येबाबतही IIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा

आयआयटी कानपूरचे प्रोफेसर आणि गणिततज्ञ मनिंद अग्रवाल यांनी News18 सोबत बोलताना सांगितलं की जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज कोरोनाचे 8 लाखाहून अधिक रुग्ण पाहायला मिळतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 10 जानेवारी : देशभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases in India) मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Third Wave of Coronavirus) सुरुवात झाली आहे आणि फेब्रुवारीत ही लाट सर्वोच्च शिखरावर असेल. सध्याची परिस्थिती आणि डाटाच्या आधारे आयआयटी कानपूरचे प्रोफेसर आणि गणिततज्ञ मनिंद अग्रवाल यांनी News18 सोबत बोलताना सांगितलं की जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज कोरोनाचे 8 लाखाहून अधिक रुग्ण पाहायला मिळतील. त्यांनी सांगितलं की पुढच्या 3-4 दिवसात चित्र स्पष्ट होईल. कोरोनामुक्त झालेल्या 92 पैकी 56 विद्यार्थिंनींना Omicronची लागण, सांगलीत खळबळ केंद्र सरकारच्या सूत्र मॉडलचं नेतृत्व करणाऱ्या मनिंद अग्रवाल यांनी म्हटलं की दिल्ली आणि मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत ही लाट आपला सर्वोच्च बिंदू गाठेल. सूत्र मॉडलनुसार, दिल्लीमध्ये दररोज 50 ते 60 हजार केस पाहायला मिळतील तर मुंबईत 30 हजार प्रकरणं समोर येतील. कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न केला असता त्यांनी सांगितलं की कोणतीही महामारी पहिल्यांदा ज्या वेगाने पसरते, त्याच वेगाने त्यात घटही होते. यामुळे तिसरी लाट शिगेवर जाताच रुग्णसंख्येत मोठी घट होताना पाहायला मिळेल. दक्षिण आफ्रिकेत हेच पाहायला मिळालं आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की हा माझ्या अभ्यासातील प्रश्न नाही. मात्र चौथी लाट जेव्हा येईल तेव्हा ती नव्या व्हेरिएंटमुळे येईल आणि या प्रश्नाचं उत्तर बायोलॉजिस्ट अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी कोरोनाचा गेम; ऑक्सिजन सपोर्टवर 24 तासांत 264 % रुग्ण निवडणूक आयोगाने कोरोना महामारीमुळे 15 जानेवारीपर्यंत निवडणूकीच्या रॅलींवर बंदी घातली आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला गेला की जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर ही बाब निवडणूक रॅलींसोबत जोडली जाऊ शकते का. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की ज्यापद्धतीने तिसरी लाट पसरत आहे, त्यानुसार निवडणूकांचा यावर काही विशेष फरक पडणार नाही. मात्र निवडणूक रॅली त्याच सर्व कारणांपैकी एक आहे, ज्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू शकतो. मात्र, तुम्ही ही रॅली रद्द केली, तरीही जास्त फरक पडणार नाही. कोणत्याही एका बाबीवर लक्ष केंद्रित न करता, सर्वच गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात