सांगली, 09 जानेवारी : राज्यात कोरोनाची (corona cases maharashtra ) तिसरी लाट येऊन धडकली आहे तर दुसरीकडे ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर सांगलीमध्ये 56 जणांना ओमायक्रॉनची ( Omicron positive) लागण झाल्याचे समोर आले आहे. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 92 विद्यार्थिनींना कोरोना लागण झाली होती,त्यापैकी 56 विद्यार्थिनींना ओमायक्रॉनची (Omicron ) लागण झाल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. सध्या सर्व मुलीही कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. पण त्यांचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आज शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( government medical college in Miraj Sangli ) शिकणाऱ्या 92 विद्यार्थिनींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला एका विद्यार्थिनीला कोरोना लागण झाली, त्यानंतर तिच्या रूममेट असणाऱ्या नऊ विद्यार्थिनींना कोरोना लागण झाली. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये जवळपास 92 विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना 30 डिसेंबर रोजी कोरोना झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्या सर्व विद्यार्थ्यांना मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांची ओमायक्रॉन टेस्ट करून, पुण्याला नमुने पाठवण्यात आले होते. दरम्यान 14 दिवसांच्या उपचारानंतर सर्व 92 जण कोरोना मुक्त झाल्या आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र आता या 92 विद्यार्थ्यांपैकी 56 विद्यार्थिनींची ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरचा रिपोर्ट आज शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला, त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण या सर्व विद्यार्थिंनींची तब्येत ठणठणीत असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे. महाराष्ट्रात 44,388 नवीन रुग्णाचे निदान राज्यात कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 44,388 नवीन रुग्णाचे निदान झाले आहे. तर १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.०४ टक्के एवढा आहे.सध्या राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहे तर २६१४ व्यक्ती सस्ंथात्मक क्वारटाइनमध्ये आहे. ( 11 वीतील मुलाच्या आत्महत्येमागे Instagram ठरलं कारणं; कुटुंबाला बसला जबर धक्का ) तर दुसरीकडे ओमायक्रॉनचा धोका आता वाढतच चालला आहे. राज्यात गेल्या २४ तासात २०७ रुग्ण आढळले आहे. धक्कादायक म्हणजे, सांगलीमध्ये सर्वाधिक ५७ रुग्ण आढळले आहे. तर मुंबईमध्ये ४० रुग्ण आढळले आहे. त्यापाठोपाठ पुणे २२, नागपूर २१, पिंपरी चिंचवड १५, ठाणे १२, कोल्हापूर ८ अमरावती ६, उस्मानाबाद ६ बुलडाणा आणि अकोल्यात प्रत्येकी ४ रुग्ण आढळले आहे. नंदूरबार, सातारा आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहे. तर औंरगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत सर्वाधिक ६०६ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळले आहे. तर पुण्यात रुग्ण संख्या २२३ वर आहे. तर ४५४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.