Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus: पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी कोरोनाचा गेम, ऑक्सिजन सपोर्टवर 24 तासांत 264% रुग्ण वाढले

Coronavirus: पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी कोरोनाचा गेम, ऑक्सिजन सपोर्टवर 24 तासांत 264% रुग्ण वाढले

Punjab Corona News: पंजाबमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 24 तासांत तिपटीहून अधिक वाढली आहे. शुक्रवारी राज्यात एकूण 62 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर होते. तर, शनिवारी हा आकडा वाढून 226 झाला.

    चंदीगड, 09 जानेवारी : देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार झपाट्यानं होत आहे. अनेक राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. दरम्यान, पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 24 तासांत तिपटीहून अधिक वाढली आहे. शुक्रवारी राज्यात एकूण 62 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर होते. तर, शनिवारी हा आकडा वाढून 226 झाला. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Election) पंजाबमध्ये कोरोना विषाणूच्या (Corona Cases in Punjab) प्रसारामुळं परिस्थिती आणखी बिघडत आहे. आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये 1 जानेवारी रोजी 23 रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर दाखल करण्यात आलं होतं. 1 जानेवारी रोजी राज्यात 332 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. शुक्रवारी राज्यात 2 हजार 901 कोरोना रुग्ण आढळले. शनिवारी ही संख्या 3 हजार 643 वर पोहोचली. शुक्रवारी लेव्हल 3 सपोर्टवर 20 रुग्ण होते. शनिवारी त्यांची संख्या जवळजवळ तिपटीनं वाढून 55 झाली. याच कालावधीत एकूण 11 रुग्णांना व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आलं होतं. ही संख्या शुक्रवारी 6 होती. 1 जानेवारीला एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नव्हता. मात्र, 18 रुग्ण लेव्हल 3 सपोर्टवर होते. हे वाचा - Maharashtra Corona : महाराष्ट्र सरकारचा अवघ्या बारा तासात यूटर्न, ब्यूटी पार्लर आणि जीमसाठी नवी नियमावली जारी त्याचबरोबर चंदीगडमधील शाळा, महाविद्यालयं, कोचिंग सेंटरसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनानं जारी केलेल्या आदेशानुसार सर्व शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक व शैक्षणिक उपक्रम ऑनलाइन पद्धतीनं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे वाचा - Nude Photography मुळे पुण्यात नवा वाद; प्रदर्शन बंद करण्याचे आदेश, माझ्याच फोटोंच्या प्रदर्शनावर बंदी का? तरुणाचा सवाल पंजाबमधील कोरोना पॉझिटिव्ह सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण शनिवारी 14.64 टक्क्यांपर्यंत वाढलं होतं. शुक्रवारी हा दर 11.75 टक्के होता. 1 जानेवारीला राज्यातील पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर 2.02 टक्के होता. पंजाबमध्ये चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. यामध्ये पटियालामध्ये 840, मोहालीमध्ये 563, लुधियानामध्ये 561 आणि अमृतसरमधील 346 प्रकरणांचा समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या