मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /अभिमानास्पद! भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं वर्ल्ड बँकेनं केलं कौतुक; लसीकरणाबाबत म्हणाले...

अभिमानास्पद! भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं वर्ल्ड बँकेनं केलं कौतुक; लसीकरणाबाबत म्हणाले...

जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक भारताने एप्रिलमध्ये कोविड -19 लसीची निर्यात कोरोनाव्हायरस साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर थांबवली होती. जेणेकरून देशातील संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करता येईल.

वॉशिंग्टन 17 ऑक्टोबर : भारतात मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं होतं. मात्र, आता ही लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. असं असलं तरीही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असल्यानं देशात लसीकरण कार्यक्रम वेगात सुरू आहे. जागतिक बँकेचे (World Bank) अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) यांनी कोविड -19 महामारीविरूद्धच्या (Covid-19 Pandemic) यशस्वी लसीकरण कार्यक्रमासाठी (Corona Vaccination in India) भारताचे अभिनंदन केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी लस उत्पादन आणि वितरणाच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबद्दल भारताचे आभार मानले.

धक्कादायक! कोरोनामुळे 6 लाख लोकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला

सीतारामन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, मालपास यांनी वॉशिंग्टनस्थित आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सीच्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासह जागतिक बँक समूहाच्या सर्व घटकांमध्ये भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

जागतिक बँकेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांनी हवामान बदलावरील भारताच्या प्रयत्नांवर देखील चर्चा केली. जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक भारताने एप्रिलमध्ये कोविड -19 लसीची निर्यात कोरोनाव्हायरस साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर थांबवली होती. जेणेकरून देशातील संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करता येईल.

धक्कादायक! कोरोना लशीऐवजी सापाचा दंश; लसीकरणावेळी तिने चक्क कोब्राच बाहेर काढला

गेल्या महिन्यात, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी घोषणा केली की भारत पुन्हा परदेशी देशांना लस निर्यात करण्यास सुरुवात करेल. मालपासने सीतारामन यांचं भारताच्या कोविड -19 लसीकरण मोहिमेबद्दल अभिनंदन केले आणि लस उत्पादन आणि वितरणात भारताच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले, असे निवेदनात म्हटले आहे.

First published:
top videos

    Tags: Corona patient, Coronavirus cases