Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus Vaccine: आजच मिळणार जगाला कोरोनाला हरवणारी लस? एका ट्वीटमुळे खळबळ

Coronavirus Vaccine: आजच मिळणार जगाला कोरोनाला हरवणारी लस? एका ट्वीटमुळे खळबळ

ताप येणं, डोकं दुखणं आणि जाईंट्स दुखणे असे साईड इफेक्ट्सही आढळून आले आहेत.

ताप येणं, डोकं दुखणं आणि जाईंट्स दुखणे असे साईड इफेक्ट्सही आढळून आले आहेत.

कोरोनावर उपायकारक ठरणारी लस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल 100 देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

    लंडन, 21 जुलै : गेल्या सात महिन्यांपासून सारं जग कोरोनाव्हायरस (Coronavirus) नावाच्या अदृश्य अशा संकटाशी सामना करत आहे. जगभरात आतापर्यंत 1.5 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोव्हिड-19 मुळे तब्बल 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच कोरोनावर उपायकारक ठरणारी लस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल 100 देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. मात्र पहिल्यांदाच कोरोना लशीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लांसेट या प्रसिद्ध मॅगजिनचे (Lancet Magazine) संपादक रिचर्ड होर्टन (Richard Hortan) यांच्य ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. रिचर्ड यांनी सोमवारी (20 जुलै रोजी) ट्वीट करत, उद्या कोरोनावर लस मिळणार आहे, असे सांगितले आहे. याचा अर्थ 21जुलै रोजी जगाला कोरोनाला हरवणारी लस अखेर मिळणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. रिचर्ड यांनी केलेले हे ट्वीट चर्चेत आले आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस अंतिम टप्प्यात आली असून, आज या लशीबाबत मोठी घोषणा होऊ शकते. सध्या जगभरातील 140 कंपन्या लस तयार करत आहे, या सगळ्यांवर जागतिक आरोग्य संस्था लक्ष ठेवून आहे. वाचा-Oxford Covid लशीची चाचणी यशस्वी; तरीही WHO ची पहिली प्रतिक्रिया सावधच! Oxford Covid लशीची चाचणी यशस्वी Oxford University ने संशोधित केलेल्या कोरोना लशीच्या (Covid vaccine) मानवी चाचणीचे परिणाम जाहीर झाले आणि जगभरात आशेचा किरण निर्माण झाला.या लशीची (Covaxin) निर्मिती भारतातही होणार आहे. AstraZeneca कंपनी ही लसनिर्मिती करणार आहे आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही या संस्थेची करार केला असून लशीचे एक अब्ज डोस Serum Institute of India उत्पादित करणार आहे. आता लवकरच लस बाजारात येणार, अशी आशा निर्माण झाली आहे. वाचा-Oxford च्या कोरोना लशीचे सकारात्मक रिझल्ट : पुण्याची 'सीरम' करणार उत्पादन सिनोव्हॅक बायोटेक लस तिसऱ्या टप्प्यात चिनी कंपनी सिनोव्हॅक बायोटेकच्या लशीचे ब्राझीलमधील ट्रायल तिसर्‍या टप्प्यात पोहचले आहे. दुसरीकडे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी / अ‍ॅस्ट्रॅजेनेका दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात यूकेमध्ये आणि तिसरा दक्षिण आफ्रिका-बाझीलमध्ये आहे. जर्मन कंपनी बिनोटेक फाइसरच्या सहकार्याने लस विकसित करण्याची तयारी करत आहे. मानवी चाचण्यांसाठी दोन लस भारतातही तयार होत आहेत. वाचा-धक्कादायक खुलासा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना एप्रिलमध्येच दिली Covid लस
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या