• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Oxford च्या लशीचे सकारात्मक रिझल्ट : पुण्याची 'सीरम' करणार उत्पादन, किती असेल किंमत?

Oxford च्या लशीचे सकारात्मक रिझल्ट : पुण्याची 'सीरम' करणार उत्पादन, किती असेल किंमत?

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचा (oxford corona vaccine) दुहेरी फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे.

 • Share this:
  लंडन, 20 जुलै : कोरोनाव्हायरसविरोधातील लस (coronavirus vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे आणि आता ऑक्सफर्डच्या लशीबाबत (Oxford vaccine) गूड न्यूज मिळाली आहे. या लशीच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलचा रिझल्ट समोर आला आहे आणि या लशीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोनावर शोधलेल्या ChAdOx1 nCoV-19 लशीची मानवी चाचणी झाली होती. त्याचे परिणाम आज जाहीर करण्यात आले. ते परिणाम सकारात्मक असून शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जगप्रसिद्ध लॅन्सेट मासिकात याबाबतचा एक अहवाल जाहीर झाला आहे. त्यात ते निष्कर्ष देण्यात आले आहेत. या औषधाचे कुठलेही घातक परिणाम आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर प्रतिकार शक्तीही वाढल्याचं दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे. अँटिबॉडीज आणि पांढऱ्या पेशींची वाढ झाल्याचंही आढळून आलं आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होते. हे परिमाण सकारात्मक असले तरी आणखी काही चाचण्यांची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हे वाचा - Good News: कोरोनावरच्या Oxfordच्या लशीचे परिणाम जाहीर, सर्वात मोठं यश अ‍ॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) कंपनीच्या मदतीने ऑक्सफर्ड ही लस तयार केली आहे. भारतातील पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटनेही (Pune serum institute) ऑक्सफर्डच्या लशीसंदर्भात करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी याआधी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, "ऑक्सफर्डची या लशीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी झाली आणि आता मानवी चाचणीतदेखील ही लस प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आम्ही या लशीचं उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही लस फक्त 1000 रुपयात उपलब्ध होईल" भारतीय लशीची मानवी चाचणी सुरू भारतीय औषधी कंपनी जायदस कॅडिलाने (Zydus Cadilla) बुधवारी सांगितले की त्यांनी संभाव्य कोरोना लशीची मानवी चाचणी (Human Trial) सुरू केल्या आहेत. हे वाचा - कोरोनाविरोधात प्रोटिनयुक्त औषध; क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्याचा कंपनीचा दावा कंपनीने सांगितले आहे की, ZYCoV-D ही लस प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये सुरक्षित मानली गेली आहे. यापूर्वी, या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. अमेरिकन लशीची पहिलं ह्युमन ट्रायल यशस्वी मॉडर्ना (Moderna) या अमेरिकन कंपनीच्या लशीनं पहिली चाचणी यशस्वी पार केली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले परिणाम दिसून आले. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे याचे कोणत्याही रुग्णांवर साइट इफेक्ट दिसून आले नाही आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: