धक्कादायक खुलासा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना एप्रिलमध्येच दिली Covid ची लस

धक्कादायक खुलासा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना एप्रिलमध्येच दिली Covid ची लस

एका रिपोर्टमध्ये झालेल्या या खुलाशामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे

  • Share this:

मॉस्को, 20 जुलै : जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. देशातील विविध संस्था कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो लोक लशीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच रशियाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसची लस तयार करीत असलेल्या संशोधकांच्या शेकडो टीममधील काही टीम एक एक पाऊल पुढे जात आहेत. यामध्ये रशियाचे संशोधकांचाही समावेश आहे. रशियाने दावा केला आहे की त्यांनी कोरोना लशीचं माणसांवरील ट्रायल पूर्ण केलं आहे. आताच एका रिपोर्टमधील झालेल्या खुलाशानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि रशियातील श्रीमंता व्यक्ती, देशातील अरबपतींनी एप्रिल महिन्यात कोरोनाची लस टोचून घेतली आहे.

हे वाचा-कोरोनाचं भयावह वास्तव! आई शेवटच्या घटका मोजत होती; मुलगा खिडकीतून पाहत होता

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रशियाचे अरबपती आणि राजकीय नेत्यांना कोरोना व्हायरसची लस एप्रिलमध्ये देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार राष्ट्रपती पुतीन यांना ही लस देण्यात आली आहे की नाही हे निश्चित सांगू शकत नाही. अल्यूमिनिअमची मोठी कंपनी युनायटेड रसेलचे प्रमुख अधिकारी, अरबपती आणि सरकारी अधिकाऱ्यांना लस देण्यात आली आहे. ही लस मॉस्को येथील रशियाची सरकारी कंपनी गमलेया इन्स्टिट्यूटने एप्रिलमध् तयार केली होती.

या माहितीनंतर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. जर खरंच रशियाने कोरोनाच्या लशीची मानवी ट्रायल पूर्ण केलं असेल तर त्याबाबत माहिती देण्यात का आली नाही..याबाबतच्या चर्चां सुरू झाल्या आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: July 20, 2020, 8:50 PM IST

ताज्या बातम्या