मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Oxford Covid लशीची चाचणी यशस्वी; तरीही WHO ची पहिली प्रतिक्रिया सावधच!

Oxford Covid लशीची चाचणी यशस्वी; तरीही WHO ची पहिली प्रतिक्रिया सावधच!

त्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.

त्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.

Oxford University ने संशोधित केलेल्या कोरोना लशीच्या (Covid vaccine) मानवी चाचणीचे परिणाम जाहीर झाले आणि जगभरात आशेचा किरण निर्माण झाला. पण WHO ने का अशी प्रतिक्रिया दिली?

जीनिव्हा, 20 जुलै : Oxford University ने संशोधित केलेल्या कोरोना लशीच्या (Covid vaccine) मानवी चाचणीचे परिणाम जाहीर झाले आणि जगभरात आशेचा किरण निर्माण झाला. चाचण्या यशस्वी झाल्याच्या या बातमीने गेले 4 महिने Coronavirus मुळे नकारात्मक झालेलं वातावरण एकदम आनंदी झालं. कारण या लशीची (Covaxin) निर्मिती भारतातही होणार आहे. AstraZeneca कंपनी ही लसनिर्मिती करणार आहे आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही या संस्थेची करार केला असून लशीचे एक अब्ज डोस Serum Institute of India उत्पादित करणार आहे. आता लवकरच लस बाजारात येणार, अशी आशा निर्माण झाली आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मात्र या बातमीवर अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काय आहे त्यामागचं कारण?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे संशोधित केलेल्या या लशीच्या चाचण्यांचा अहवाल The Lancet या नामवंत विज्ञान प्रकाशनामध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये ही लस सुरक्षित आणि आशादायी असल्याचं म्हटलं आहे. WHO ने सुद्धा या लशीचं स्वागत केलं आहे. पण अशा जगभरातल्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा आणखी लसी विकसित व्हायल्या हव्यात, असंही संघटनेचं म्हणणं आहे.

Oxford च्या कोरोना लशीचे सकारात्मक रिझल्ट : पुण्याची 'सीरम' करणार उत्पादन

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचं अभिनंदन करताना WHO ने लशीचं स्वागत केलं आहे. चाचणी झाली त्या व्यक्तींवर या लशीचे चांगले परिणाम दिसले असल्याचंही नमूद केलं आहे. पण तरीही अजून खूप काही बाकी आहे, असा सबुरीचा सल्लाही द्यायला WHO विसरलेली नाही.

कोरोना विषाणूविरोधात इम्युनिटी निर्माण झाली का? मुंबईत कमी झाला रुग्णवाढीचा दर

डॉ. माईक रायन यांनी WHO च्या वतीने या लशीवर प्रतिक्रिया दिली. "This is a positive result, but again there is a long way to go" असं त्यांनी म्हटलं आहे. चाचणीचे परिणाम चांगले आहेत पण अजून भरपूर वेळ आहे, असं त्यांनी सांगितलं. सप्टेंबरमध्ये लस येणार असं सांगितलं जात असताना WHO ची ही प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Oxford