नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 27 लाख 2 हजार 743 झाली आहे. 24 तासांत 55 हजार 079 नवीन प्रकरणं सापडली तर, 876 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 6 लाख 73 हजार 166 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 51 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 19 लाख 77 हजार 780 रुग्ण निरोगीही झाले आहेत. यासह देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 73.17% झाला आहे.
मुख्य म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि बिहारमधील नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाला आहे. महाराष्ट्रात सोमवारी 8,493 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,04,358 झाली. तर एका दिवसात 11,391 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही 4,28,514वर पोहोचली आहे.
वाचा-मलेशियातील दहापट जास्त भयंकर कोरोनाचं 'भारत' कनेक्शन, धक्कादायक माहिती आली समोर
Spike of 55,079 cases and 876 deaths reported in India, in the last 24 hours. The #COVID19 tally in the country rises to 27,02,743 including 6,73,166 active cases, 19,77,780 discharged/migrated & 51,797 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/Sxky8lb11G
— ANI (@ANI) August 18, 2020
वाचा-जगाला मिळाली आणखी एक Corona Vaccine, रशियानंतर 'या' देशानं दिली मान्यता
24 तासांत या राज्यात सर्वात जास्त मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 228 लोकांचा मृत्यू झाला. तर तमिळनाडूमध्ये 120, आंध्र प्रदेशात 82, उत्तर प्रदेशात 66, पश्चिम बंगालमध्ये 45, पंजाबमध्ये 50, मध्यप्रदेशात 23, गुजरातमध्ये 15, केरळमध्ये 13, तेलंगणात 10 आणि जम्मू-कश्मीरमध्ये 6. तर, दिल्लीत 18, गोव्यात 7, त्रिपुरात 4, पुद्दुचेरीत 4, मणिपुरमध्ये 1 आणि चंदीगढ़मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.
आतापर्यंत 3 कोटीहून अधिक चाचण्या
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार (ICMR) आतापर्यंत देशात 3 कोटी 9 लाख 41 हजार 264 कोरोना चाचणी झाल्या आहेत. आज 24 तासांत 8.97 लाख कोरोना चाचण्या पार पडल्या.
वाचा-भारतात काय असेल ‘कोरोना’च्या लशीची किंमत? कंपन्यांनी दिली सरकारला माहिती
जगातील एकूण मृतांपैकी 16.65% भारतात
जगभरातील एकूण मृतांपैकी 18.83% लोक अमेरिकेत, 16.93% लोक ब्राझीलमध्ये आणि 16.65% लोक भारतातील आहेत. भारतात दररोज 900 लोकांचा जीव जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine