बीजिंग, 18 ऑगस्ट : रशियानंतर (Russia) आता चीननेही कोरोनाव्हायरस लशीला मान्यता दिली आहे. सरकारनं या कोव्हिड-19 लशीला (Covid-19 Vaccine) पेटंटही दिले आहे. चीनी लस कंपनी कॅन्सायनो बायोलॉजिक्स कॉर्पोरेशन (CanSino) यांना कोरोना लस Ad5-nCOVच्या पेटंटसाठी मान्यता मिळाली आहे. मात्र, रशियन लसप्रमाणेच, या लसीवरही असा आरोप केला जात आहे की फेज -3 चाचणीच्या रिझल्टची वाट न पाहता या लशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लस वैज्ञानिक कामगिरीपेक्षा व्यावसायिक कामगिरी मानली जात आहे.
चीनचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसासर, कंपनीचा असा दावा आहे की, जर चीनमध्ये कोरोनाव्हायरसची साथ पसरली तर या लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येईल. पेटंटने या लशीच्या सुरक्षिततेचा आणि प्रभावीपणाचा दावा मजबूत केला आहे. चीननं ही लस मर्यादित वापरासाठी मंजूर केली होती.
वाचा-भारतात काय असेल ‘कोरोना’च्या लशीची किंमत? कंपन्यांनी दिली सरकारला माहिती
जूनमध्येच चिनी सैन्य दलातील जवानांसाठी CanSino बायोलॉजिक्स लस मंजूर झाली होती. 11 ऑगस्ट रोजी चीनच्या इंटलेक्चुअर प्रॉपर्टी अंतर्गत CanSino या लसीच्या पेटंटसाठी मान्यता दिली. चीननं पहिल्यांदाच कोरोना लशीचा मान्यता दिली आहे.
वाचा-पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! कोरोनाविरोधात विकसित होतेय Herd immunity
या कारणामुळे पेटंटला दिली मान्यता
चीनचे सरकारी वृत्तपत्र पीपल्स डेली यांनी रविवारी नॅशनल इंटलेक्चुअर प्रॉपर्टी अंतर्गत 11 ऑगस्ट रोजी या लशीला परवानगी दिली होती. त्याच दिवशी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन लस Sputnik-V ची घोषणा केली. CanSinoने जाहीर केले की ते रशिया, ब्राझील आणि चिली तसेच सौदी अरेबियामध्ये फेज -3 क्लिनिकल चाचण्या सुरू करतील. सौदी अरेबियामध्येही पाच हजाराहून अधिक वॉलेंटिअर तयार आहेत.
वाचा-मलेशियात सापडला D614G व्हायरस, वाचा का आहे कोरोनापेक्षाही 10 पट जास्त भयंकर?
Ad5-nCOV असे आहे वॅक्सिनचे नाव
ही लस CanSinoने अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सच्या सहकार्य़ानं तयार केली आहे. हीचे नाव Ad5-nCOV ठेवण्यात आले आहे. सामान्य सर्दी-खोकलाच्या व्हायरसमध्ये बदल करून नोवल कोरोनाव्हायरसचे जेनेटिक मटेरिअल यात जोडले आहे. वॉल्टर आणि एलिझा हॉल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रोफेसर मार्क पेलेग्रीनी यांनी द गार्डियन वृत्तपत्राला सांगितले की, "या पेटंटमुळे आता या लसीची नक्कल कोणी करणार नाही. मात्र क्लिनिकल चाचण्या पुढे जाण्यासाठी पेटंट आवश्यक निकष नाही". दरम्यान, सौदी अरेबियाने या महिन्यात सांगितले होते की CanSinoच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine