Home /News /videsh /

अलर्ट! मलेशियातील दहापट जास्त भयंकर कोरोनाचं 'भारत' कनेक्शन, धक्कादायक माहिती आली समोर

अलर्ट! मलेशियातील दहापट जास्त भयंकर कोरोनाचं 'भारत' कनेक्शन, धक्कादायक माहिती आली समोर

फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या शेन्ड्स हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना रूग्णांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातील एका खोलीतून हे नमुने वेगळे केले आहेत. व्हायरस पकडण्यासाठी दोन सॅम्पलर वापरले.

फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या शेन्ड्स हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना रूग्णांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातील एका खोलीतून हे नमुने वेगळे केले आहेत. व्हायरस पकडण्यासाठी दोन सॅम्पलर वापरले.

चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या कोव्हिड-19 पेक्षा हा नवा व्हायरस जास्त धोकादायक आहे. मात्र आता या व्हायरसमागे भारत कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.

    क्वालालंपूर, 18 ऑगस्ट : एकीकडे जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असताना आता मलेशियात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस कोरोनापेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे. असा विश्वास आहे की चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या कोव्हिड-19 पेक्षा हा नवा व्हायरस जास्त धोकादायक आहे. मात्र आता या व्हायरसमागे भारत कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकामध्ये आढळला. मलेशियामध्ये D614G व्हायरसची 3 प्रकरणं समोर आली आहेत 45 लोकांच्या चौकशीत ही नवीन प्रकरणे उघडकीस आली. हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकामध्ये आढळला. ही व्यक्ती भारतातून मलेशियाला परतली होती. दरम्यान त्यांना 14 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगितले होते. त्यांनी या नियमाचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांना 5 महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वाचा-मलेशियात सापडला D614G व्हायरस, वाचा का आहे कोरोनापेक्षाही 10 पट जास्त भयंकर? सुपर स्प्रेडर आहे हा व्हायरस वैद्यकीय संशोधन संस्थाला (IME) D6140 प्रकारचा व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस सिवागंगा क्लस्टर मलेशियामध्ये सापडला आहे. आरोग्य महासंचालक डाटुक डॉ. नूर हिशम अब्दुल्ला यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की D614G म्यूटेशन पहिल्यांदा जुलैमध्ये आढळून आला. हा व्हायरस इतका खतरनाक आहे की, यामुळे जगभरातील सर्व लशीचे काम वाया जाऊ शकते. या व्हायरसला एक सुपर स्प्रेडर मानले जाते. यामध्ये 10 पटीने अधिक वेगाने इतर व्यक्तींना संक्रमित करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत, विविध सार्वजनिक आरोग्य नियंत्रणे प्रयत्नांद्वारे नियंत्रित आहेत. वाचा-जगाला मिळाली आणखी एक Corona Vaccine, रशियानंतर 'या' देशानं दिली मान्यता काय आहे D614G व्हायरस? D614G व्हायरसला G म्यूटेशन असेही म्हटले जाते. याचे पहिले प्रकरण प्रथम जानेवारीमध्ये दिसून आले आणि त्यानंतर चिंता वाढली आहे. हा व्हायरसने मूळ "L" आणि "S" या रूपांना जन्म दिला आहे. हे श्वसनमार्गामध्ये अधिक व्हायरल प्रती तयार करते आणि एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे अधिक कार्यक्षमतेने पसरते. जनतेने जागरुक राहून सावध राहिले पाहिजे, असे आरोग्य महासंचालकांनी सांगितले. कारण मलेशियामध्ये कोव्हिड -19 सह आढळून आलेला D614G व्हायरस सामान्य व्हायरस नाही आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या