न्यू मेक्सिको, 09 फेब्रुवारी : आपल्याला कोरोना (coronavirus) झाला हे ऐकून कित्येक जणांच्या पायाखालची जमीन सरकते. पण अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीनं (4 year old girl battle with coronavirus) या महाभयंकर कोरोनाशी टक्कर दिली आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ महिने तिनं कोरोनाशी झुंज दिली आणि अखेर कोरोनाविरोधातील लढ्यात ती यशस्वी झालीच. कोरोनावर तिनं मात केली. यानंतर तिला हॉस्पिटलमधून अनोख्या पद्धतीनं निरोप देण्यात आला. कोरोनातून बऱ्या झालेल्या चार वर्षांच्या एका मुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देताना भावुक झालेले डॉक्टर्स, नर्सेस आदी कर्मचारी यांचा एक अवघ्या 24 सेकंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको हेल्थ सायन्सेस हॉस्पिटलनं (University Of New Mexico Health Sciences-UNMHSC) शेअर केलेल्या व्हिडिओनं अनेकांची मनं जिंकली असून, डोळ्यात पाणी आणलं आहे. कारण या व्हिडिओतील या चार वर्षांच्या मुलीनं कोरोनाशी तब्बल 9 महिने झुंज देऊन त्याला हरवलं आहे.
After a severe bout with COVID-19, 4-year-old Stella Martin is leaving UNM Hospital. ❤️
— UNM Health Sciences (@UNMHSC) January 27, 2021
Stella came into the hospital in April after contracting COVID-19. She spent over 5 months in the Pediatric ICU and arrived in the CTH Acute Service in October. pic.twitter.com/8yfIUHonsl
या चिमुकलीचं नाव आहे स्टेला मार्टिन (Stela Martin). अस्थमाचा त्रास असलेल्या स्टेलाला तिला तिच्या वडिलांकडून कोरोनाचा संसर्ग झाला. दुर्दैवानं तिच्या वडिलांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला. स्टेलाची परिस्थितीही गंभीर होती. तिची फुफ्फुस अतिशय क्षीण झाली होती. प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं ती एक आठवडा कोमात होती; मात्र त्यातूनही ती बाहेर आली आणि तिनं कोरोनाला नव्हे; मृत्यूला हरवलं. हे वाचा - Corona प्रसाराचं कारण काय? वुहानच्या मार्केटमध्ये WHOला मिळाले नवे संकेत 27 जानेवारी रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला. कोरोनाशी प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर चार वर्षांची स्टेला मार्टिन बरी होऊन आपल्या घरी चालली आहे. स्टेला एप्रिलमध्ये कोरोना झाल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. पाच महिने लहान मुलासाठीच्या अती दक्षता विभागात घालवल्यानंतर तिला ऑक्टोबरमध्ये सिटीएच अॅक्युट सर्व्हिसमध्ये आणण्यात आलं, आता ती पूर्ण बरी झाली असून तिला घरी सोडण्यात आलं आहे. असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये स्टेलाला हॉस्पिटलमधील कर्मचारी तिच्या रूमबाहेर घेऊन येत असताना एका हॉलमध्ये दोन्ही बाजूला डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी उभे असून ते टाळ्या वाजवत, स्टेलाला चीअर अप करत, तिला शुभेच्छा देताना दिसतात. मास्क घातलेली, अंगावर ब्लँकेट घेतलेली स्टेला आनंदानं सगळं बघताना दिसत आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोना लस घेतली आणि तडफडत जमिनीवर कोसळला; 25 मिनिटांतच गेला जीव या मुलीसह तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सगळ्यांच्या अथक मेहनतीचं, संघर्षाचं हे यश आहे. त्यामुळे सगळ्यांसाठीच ही चिमुकली बरी होऊन घरी जाण्याचा क्षण अतिशय आनंदाचा, भावपूर्ण होता. एका दुसऱ्या ट्विटमध्ये या हॉस्पिटलनं स्टेलाला आयपॅड (iPad)दिल्याबद्दल समाजातील दानशूर लोकांचे आभार मानले आहेत. कारण इतका प्रदीर्घ काळ आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर असलेली अवघ्या चार वर्षाची स्टेला या आयपॅडद्वारेच घरच्यांच्या संपर्कात राहू शकली. स्टेला आणि तिच्यासारख्या इतर अनेक रुग्णांना बरं करण्यासाठी रात्रंदिन काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचेही हॉस्पिटलनं आभार मानले आहेत.
We would like to say a special thanks to our community for donating IPads. Thanks to you, Stella was able to stay connected with her family. We celebrate her recovery and the hard work and dedication of our health care team who work tirelessly to help patients like her.👏
— UNM Health Sciences (@UNMHSC) January 27, 2021
स्टेलाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 9 हजार वेळा पाहिला गेला असून, जगभरातील लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कोविड 19 हा फक्त वृद्धांना होतो किंवा तो नाहीच आहे, असं म्हणणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ आवर्जून दाखवला पाहिजे असं मत एका युजरनं व्यक्त केलं आहे. एवढ्याशा चिमुरडीचं हे धैर्य कोरोनामुळं हतबल झालेल्या अनेकांना प्रेरणा देणारं आहे.