Corona प्रसाराचं कारण काय? वुहानच्या मार्केटमध्ये WHOला मिळाले नवे संकेत

Corona प्रसाराचं कारण काय? वुहानच्या मार्केटमध्ये WHOला मिळाले नवे संकेत

वुहान मार्केटमध्ये कोरोना (Corona) प्रसार होताच लोकांनी आपली उपकरणं आणि सामान तिथंच सोडलं. त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा पुरावाही त्यांनी तसाच सोडला आणि WHOनं त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 9 फेब्रुवारी : जगभरात थैमान घालून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनाबद्दल (Corona) तपास करण्यासाठी जागितक आरोग्य संघटना म्हणजेच WHO (World Health Organisation) ची टीम चीनच्या वुहानमध्ये (Wuhan) गेली आहे. ही टीम सध्या तपास करत असून रिपोर्टनुसार, कोरोना पसरण्यात वुहानच्या सी फूड मार्केटची असणाऱ्या भूमिकेबद्दलचे काही सुगावे त्यांच्या हाती लागले आहेत. न्यूयॉर्कमधील जंतुशास्त्रज्ञ पीटर दासझाक म्हणाले की, 10 फेब्रुवारीपूर्वी चौकशीत सापडलेले महत्त्वाचे मुद्दे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, 14 सदस्यीय तपास पथकाने चिनी तज्ञांसमवेत काम केलं आणि वुहानमध्ये नेमकं काय घडलं हे शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी वुहानच्या महत्त्वाच्या हॉट स्पॉट्सला भेट दिली.

बर्‍याच संशोधनात असा दावा केला जात होता, की व्हायरसच्या उत्क्रांतीत या बाजारपेठेचा कोणताही हात नाही. या युक्तिवादाकडे दुर्लक्ष करून डब्ल्यूएचओच्या संशोधकांनी पुढील तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि बाजाराच्या भूमिकेविषयी महत्त्वपूर्ण संकेत सापडले. दासझाक यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. ते म्हणाले, सध्या आम्ही सर्व गोष्टी एकत्रित करण्याचा आणि कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. विषाणूचा प्रसार झाल्यानंतर वुहान फूड मार्केट बंद केलं गेलं. यावेळी लोक घाईघाईनं पळत सुटले. त्यांनी आपली उपकरणं आणि सामान तिथंच सोडलं. त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा पुरावाही त्यांनी तसाच सोडला आणि आम्ही त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं.

दासझाक म्हणाले, आता आम्हाला बर्‍याच गोष्टी माहिती आहेत, ज्या यापूर्वी माहिती नव्हत्या. संक्रमित लोकांशिवाय असेही काही लोक होते ज्यांना लक्षणे नव्हती. किंवा असेही काही लोक होते ज्यांना सामान्य व्यक्तीप्रमाणंच खोकला आणि सर्दी होती. ते म्हणाले, की वुहानमधील रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या रूग्णाव्यतिरिक्त, शहरातील इतर लोकांनाही संसर्ग झाला हे अनपेक्षित नाही. पण त्यांची संख्या किती होती. हे सर्व केव्हा सुरू झाले? या गोष्टींवर सध्या आम्ही काम करत आहोत. दासझाक म्हणाले, की या महामारीचा प्रसार कमी करण्यासाठी हा तपास टर्निंग पॉईंट ठरू शकतो.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दासझाक म्हणाले, या तपासामुळं नेमकं काय घडलं याची सखोल आणि व्यापक माहिती घेण्यात मदत होईल. जेणेकरून पुढील साथीचे रोग पसरण्यापासून थांबवता येतील. ठासळणारी जागतिक अर्थव्यवस्था काही प्रमाणाक रूळावर आणता येईल आणि लसीकरणाची वाट पाहात होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी करता येईल. जागतिक स्तरावर 10 कोटी लोक आतापर्यंत कोरोना संक्रमित झाले आहेत. तर, 23 लाखाहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे,

Published by: Kiran Pharate
First published: February 9, 2021, 7:49 AM IST

ताज्या बातम्या