जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / धक्कादायक! कोरोना लस घेतली आणि तडफडत जमिनीवर कोसळला; 25 मिनिटांतच गेला जीव

धक्कादायक! कोरोना लस घेतली आणि तडफडत जमिनीवर कोसळला; 25 मिनिटांतच गेला जीव

धक्कादायक! कोरोना लस घेतली आणि तडफडत जमिनीवर कोसळला; 25 मिनिटांतच गेला जीव

कोरोना लस (corona vaccine) घेतली तेव्हा त्या व्यक्तीला काही समस्या जाणवली नाही, पण 25 मिनिटांनंतर ती व्यक्ती जमिनीवरच कोसळली.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 09 फेब्रुवारी : कोरोना लसीकरण (corona vaccination) सुरू झाल्यानंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे. पण कोरोना लशीचे काही दुष्परिणामही (corona vaccine side effect) समोर येते आहेत. हे दुष्परिणाम गंभीर नसल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दरम्यान कोरोना लस घेतल्यानंतर काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत आहे. पण हा मृत्यू कोरोना लशीशी (corona vaccine) संबंधित नसल्याचंदेखील स्पष्ट केलं जातं आहे. असं असताना आता अमेरिकेतून (america) धक्कादायक प्रकरण समोर येतं आहे, ज्यामध्ये कोरोना लस घेतल्यानंतर अवघ्या 25  मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिथं लस घेतली त्या जागेवरच त्या व्यक्तीचा जीव गेला आहे. कोरोना लस घेणाऱ्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण त्यांचे मृत्यू हे लस घेतल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीनंतर झाले आहेत. पण न्यूयॉर्कमधील (newyork) एका वृद्धाचा मात्र लस घेतली त्याच दिवशी किंबहुना 25 मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण म्हणजे हादरवणारंच आहे. हे वाचा -  कोरोनाचा प्रसार कसा झाला? वुहानच्या मार्केटमधून WHO ला मिळाले नवे संकेत आज तक च्या रिपोर्टनुसार न्यूयॉर्कमधील हेल्थ कमिशनर डॉक्टर हावर्ड झुकर यांनी सांगितलं की, लस घेतल्यानंतर 15 मिनिटं ही व्यक्ती क्लिनिकमध्ये होती. त्यावेळी तिला कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. त्यानंतर काही वेळानं ही व्यक्ती क्लिनिकमधून बाहेर गेली तेव्हा ती जमिनीवर कोसळलली. तिथले सुरक्षारक्षक त्या व्यक्तीजवळ पोहोचले आणि रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळानं तिला मृत घोषित करण्यात आलं. हे वाचा -  लसीकरण सुरू झालं म्हणजे आता कोरोनापासून कायमची सुटका झाली का? या व्यक्तीला कोणती कोरोना लस देण्यात आली होती हे माहिती नाही. शिवाय तिचा मृत्यू कोरोना लशीमुळेच झाला की नाही हेदेखील स्पष्ट नाही. पण कोरोना लस सुरक्षित आहे, असं झुकर यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात