जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घाबरू नका, पण सावध राहा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक बातमी

घाबरू नका, पण सावध राहा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक बातमी

कोरोना हा आजार खोटा असल्याचे सांगणारा तरुण फिटनेस इफ्लूएसर रुपात चर्चित होता आणि फिटनेससे संबंधित व्हिडीओ शेअर करत होता. नुकताच तो तुर्कस्तानच्या ट्रिपला गेला होता.

कोरोना हा आजार खोटा असल्याचे सांगणारा तरुण फिटनेस इफ्लूएसर रुपात चर्चित होता आणि फिटनेससे संबंधित व्हिडीओ शेअर करत होता. नुकताच तो तुर्कस्तानच्या ट्रिपला गेला होता.

कोरोनाव्हायरसच्या संसर्गाबाबत नवी माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 10 एप्रिल : भारतात कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे (Coronavirus second wave) चिंता वाढली आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊन लावला जात आहे. विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. याचदरम्यान अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे. कोरोनाव्हायरसबाबत नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाव्हायरस हा पृष्ठभागावरून पसरण्याचा धोका का खूपच कमी असल्याचं अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) सांगितलं. दहा हजारांपैकी एक प्रकरण असं असतं, ज्यात कोरोना पृष्ठभागावरून पसरतो. त्यामुळे पृष्ठभागावरून कोरोना पसरेल याबाबत फार घाबरू नका, असं सीडीसीने सांगितलं. हे वाचा -  Maharashtra Lockdown : काय सुरू आणि काय बंद? सरकारने जारी केले नवे नियम सीडीसीने दिलेल्या या माहितीचा जागतिक स्तरावर मोठा परिणाम होईल. कारण कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात हॉटेल, रूम, ऑफिस, शाळा, गाड्या, रेस्टॉरंट अशी बरीच सार्वजनिक ठिकाणी नियमित सॅनिटाइझ केली जातात. सीडीसीचे संचालक रोशेल वॅलेन्स्की यांनी सांगितलं की, पृष्ठभागावर कोरोनाव्हायरस असेल आणि त्याच्या संपर्कात आल्यानेदेखील लोक संक्रमित होऊ शकतात. पण याचा दर खूपच कमी आहे. सीडीच्या गाइडलाइन्सनुसार कोरोनाव्हायरस पसरण्याचा मुख्य मार्ग हा पृष्ठभाग नाही तर थेट संपर्क आहे. म्हणजे एकमेकांच्या संपर्कात आल्यानेच हा व्हायरस पसरतो. हे वाचा -  SSC, HSC परीक्षेदरम्यान कोरोना झाला तर अशा विद्यार्थ्यांचं काय? यावरूनच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क किती महत्त्वाचं आहे हे दिसून येतं. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी या गोष्टींचं भान राखणं आणि त्यांचं पालन करायलाच हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात