मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

नदीत तरंगणारे मृतदेह भीतीदायक! काय पाण्याच्या माध्यमातून पसरतो कोरोना? वाचा सविस्तर

नदीत तरंगणारे मृतदेह भीतीदायक! काय पाण्याच्या माध्यमातून पसरतो कोरोना? वाचा सविस्तर

देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक हृदयद्रावक घटना या काळात समोर येत आहे. दरम्यान काही चित्र डोळ्यासमोरुन न हटणारी ठरतात. UP-बिहारमधून देखील असंच मन हेलावून टाकणारं दृश्य समोर आलं होतं. ते म्हणजे नदीत वाहून येणारे मृतदेह!

नवी दिल्ली, 13 मे: देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक हृदयद्रावक घटना या काळात समोर येत आहे. दरम्यान काही चित्र डोळ्यासमोरुन न हटणारी ठरतात. UP-बिहारमधून देखील असंच मन हेलावून टाकणारं दृश्य समोर आलं होतं. ते म्हणजे नदीत वाहून येणारे मृतदेह! बिहार (Bihar), उत्तर प्रदेशातून (UP) वाहणाऱ्या गंगा नदीमध्ये 70 हून जास्त मृतदेह मिळाले आहेत. हे तरंगणारे मृतदेह कुणी पाण्यात सोडले याबद्दल पोलीस तपास करत आहेत. पण आता गंगेच्या पाण्यातून कोविड (Covid-19)  पसरू शकतो का असा प्रश्न सामान्य गावकरी विचारत आहेत. या मृतदेहांमुळेही कोरोना पसरेल अशी भीती व्यक्त होत आहे. याबद्दल जाणून घेऊया अधिक माहिती.

मृतदेहांमुळे कोरोना पसरेल का?

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एम्सने मृतदेहांबाबत काही मार्गदर्शक सूचना (Guidelines) केल्या आहेत. त्यात असं म्हटलंय की मृतदेह हाताळताना कोविड संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे ते काम करताना मास्क लावा, ज्यात मृतदेह ठेवायचा आहे त्या बॅगही डिसइन्फेक्ट करून घ्या.

पाण्यातून कोविड पसरू शकतो का?

खोकणं, शिंकणं यामुळे कोविड परसरतो. या शिंकण्यातून उडणारे शिंतोडे आणि हवेतील एअरोसोल्स कोविड पसरवू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे. पण वाहत्या पाण्यातून पाण्यातून कोणाला कोविड संसर्ग झाल्याचा वैद्यकीय पुरावा उपलब्ध नाही. कोरोनाचं संक्रमण झालेल्याच्या विष्ठेत कोरोना विषाणू मिळाल्याचा दावा काही अभ्यासंकांनी केला आहे. अद्याप यामुळे कोविड पसरू शकतो का हे अजून सिद्ध झालेलं नाही. मात्र शरीरातील तरल पदार्थांच्या माध्यमातून कोविडचं संक्रमण होऊ शकतं.

हे वाचा-कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास पहिला डोस पुन्हा घ्यायचा का?

अद्याप असा कोणताही पुरावा सापडला नाही आहे की, वाहणारं पाणी किंवा स्विमिंग पूलमध्ये SARS-CoV-2 पसरू शकतो. मात्र काही अभ्यासांत असं दिसून आलं की नदीतल्या दूषित पाण्यात SARS-CoV-2 विषाणू सापडला आहे पण त्यामुळे विषाणू संक्रमण झालं आहे असं सिद्ध झालेलं नाही. मीडिया अहवालात जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने असं सांगितलं आहे की कोविड-19 स्विमिंगदरम्यान पाण्यातून पसरत नाही. जेव्हा कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क होतो तेव्हाच कोविड-19 चं संक्रमण होतं असंही यात म्हटलं आहे.

हे वाचा-'तेरा मुझसे है पहले का नाता..' म्हणत मुलानं आईला Video Call वर केलं अलविदा

कोविड संक्रमणाबाबत जगभरात अजून पुरेसं संशोधन झालेलं नाही त्यामुळे कोविड प्रसार रोखण्यासाठी आवश्यक सध्या जे उपाय केले जात आहेत तेच करत राहणं आवश्यक आहे. मृतदेहांचं विघटन सुरू होतं त्यामुळे त्यांवर मोठ्या प्रमाणात विषाणू असतात. त्यामुळे गंगेत (Ganga) सोडलेल्या देहांमुळे पाणी नक्कीच दूषित होऊ शकेल. पण या मृतदेहांशी थेट संपर्क आला तर आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्या गावांमध्ये नदीतून असे मृतदेह वाहत आले आहेत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही पण त्यांनी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Bihar, Coronavirus, Uttar pradesh news