मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत किती घातक आहे Omicron? अमेरिकेच्या टॉप शास्त्रज्ञाने केला हा दावा

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत किती घातक आहे Omicron? अमेरिकेच्या टॉप शास्त्रज्ञाने केला हा दावा

भारतासह जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे की जरी ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो फारसा घातक नाही. जगातील कोणत्याही देशात या व्हेरिएंटमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही

  • Published by:  Kiran Pharate

न्यूयॉर्क 08 डिसेंबर : ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron) ढत्या दहशतीदरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर येत आहेत. अमेरिकेचे सर्वोच्च शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे की, कोरोनाव्हायरसचा (Coronavirus Updates) ओमिक्रॉन व्हेरिएंट हा आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत जास्त गंभीर नाही. डॉ फाउची यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. तत्पूर्वी, त्यांनी दुसर्‍या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असंही सांगितलं होतं की ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे परंतु सुरुवातीचे संकेत सूचित करतात की तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी प्राणघातक आहे.

भारतासह जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे की जरी ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो फारसा घातक नाही. जगातील कोणत्याही देशात या व्हेरिएंटमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी रविवारी सीएनएनच्या स्टेट ऑफ द युनियन कार्यक्रमात सांगितलं की, ओमिक्रॉनच्या गांभीर्याबद्दल निष्कर्ष काढण्यापूर्वी वैज्ञानिकांना अधिक माहिती गोळा करणं आवश्यक आहे.

हेही वाचा - Omicron | ओमिक्रॉन धोकादायक आहे की नाही? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Omicron व्हेरिएंटचा पहिला रुग्ण जगात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत नोंदवला गेला. दक्षिण आफ्रिकेतून मिळालेल्या वृत्तात असं म्हटलं आहे, की लोकांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वेगाने वाढलेलं नाही. फाउची म्हणाले की, बायडन प्रशासन अनेक आफ्रिकन देशांमधून इथे येणा-या इतर देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर लादलेले प्रवासी निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे.

फाउची म्हणाले की आम्हाला आशा आहे की आम्ही वेळेत बंदी उठवू शकू. केवळ दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशांना ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं.

हेही वाचा - नव्या व्हेरियंटचा शोध कसा लावतात? जीनोम सीक्वेन्सिंग म्हणजे काय? जाणून घ्या

यूएसमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत, परंतु बहुतेक रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच आढळून आला आहे. देशातील 99 टक्क्यांहून अधिक रुग्णांना डेल्टाची लागण झाली आहे. कोविड-19 मुळे आतापर्यंत 780,000 हून अधिक अमेरिकन लोकांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona updates