मुंबई, 7 डिसेंबर: जगभरात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) झपाट्याने प्रसार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक देशांमध्ये जलद खबरदारीच्या उपाययोजन सुरू करण्यात आल्या आहेत. या नवीन प्रकाराच्या परिणामावर शास्त्रज्ञही अभ्यास करत असून त्यासंबंधी लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंतचे विश्लेषण असे सांगत आहे की ओमिक्रोम व्हेरिएंट काही चांगल्या तर काही वाईट बातम्या घेऊन आलाय. हा व्हेरिएंट लसीचे सुरक्षा कवच (Evading Corona vaccine) भेदण्यात यशस्वी ठरला आहे. असे असले तरी यामुळे लोकांना कोणताही गंभीर आजार होत असल्याचे अद्याप समोर आलेलं नाही.
अजून डेटा आवश्यक
सध्या ओमिक्रॉनबद्दल जास्त माहिती नाही. शास्त्रज्ञांना अजूनही स्पष्टपणे आणि निर्णायकपणे काहीतरी सांगण्यासाठी डेटाची आवश्यकता आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंतच्या निरिक्षणांद्वारे, मागील प्रकारांच्या संरचनांचा अभ्यास करून आणि संगणक मॉडेलिंगद्वारे बरीच माहिती देखील मिळवली आहे.
नवीन प्रकारांमध्ये काय फरक आहे?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनमध्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा दुप्पट म्यूटेशन झालं आहे. यामध्ये बहुतेक म्युटेशन स्पाइक प्रोटीनमध्ये आढळले आहे. तसेच हे मुकुट-आकाराचे स्पाइक प्रोटीन विषाणूच्या पृष्ठभागावर असते. लस हेच प्रथिन ओळखण्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षित करते.
पुण्यातील Omicron पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
व्हेरिएंट विषयी काळजी का?
या प्रकाराने जगातील सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. डेल्टा प्रकार स्प्रेड होऊन बराच काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनाच असं वाटत होतं की प्राणघातक डेल्टा प्रकारामुळे उद्भवलेली ही शेवटची मोठी लाट असेल, जी 1918 मध्ये इन्फ्लूएंझा महामारीच्या वेळी घडली होती. पण, ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याने लोकं चिंताग्रस्त झाले आहेत.
लसीपासून वाचण्याची क्षमता कशी शोधली जाते?
ओमिक्रॉनमध्ये जिथं म्यूटेशन झालंय त्यावरुन दोन गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे व्हायरसमध्ये लसीच्या प्रभावापासून काही प्रमाणात वाचण्याची क्षमता आहे. व्हायरसमध्ये काही स्पाइक म्यूटेशन अशा जागी आढळून आले आहेत, जे वेगाने पसरत आहेत. मागील प्रकारातील म्यूटेशनमुळे व्हायरसला "अँटीबॉडी एस्केप" करण्याची क्षमता मिळाली होती. ज्यामध्ये व्हायरस मागील संसर्गापासून किंवा लसीपासून बनवलेल्या अंटीबॉडीच्या हल्ल्यांपासून वाचू शकतो.
टी सेल बाहेर पडण्याची क्षमता?
असे दिसते की ओमिक्रोन शरीराच्या टी पेशींच्या दुसऱ्या ओळीच्या संरक्षणामुळे पूर्णपणे प्रभावित होत नाही. टी पेशी अँटीबॉडीजसह एकत्रितपणे संसर्गाशी लढतात. जरी व्हायरस अँटीबॉडीजच्या हल्ल्यात टिकून राहिला तरी टी पेशी संक्रमित पेशी नष्ट करण्याचे काम करतात.
Omicron चा मुकाबला करण्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या - WHO
टी पेशींवरील अंदाज
विषाणूच्या कोणत्या भागात म्यूटेशन होत आहे, याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष दिले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात, दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट वेंडी बर्जर्स म्हणाले, की "अनेक म्यूटेशन स्पाइक प्रोटीनच्या हॉटस्पॉटमध्ये आहेत. जे अंटीबॉडींना बंधनकारक करण्याच्या दृष्टीने विशेष आहेत. आम्ही असे गृहीत धरले की अनेक टी पेशींचा प्रतिसाद अजूनही ओमिक्रॉन विरुद्ध सक्रिय असेल. म्हणजेच सध्या ते खूप धोकादायक असेल, याची शक्यता कमी दिसत आहे.
या सर्व अनुमानांची पुष्टी करण्यासाठी संशोधकांना अधिक डेटा मिळवावा लागेल आणि त्यांची चाचणी घ्यावी लागेल. मात्र, सुरुवातीचे संगणक विश्लेषण या अनुमानांना समर्थन देते. आता त्यांना पेशींची प्रतिक्रियाही जाणून घ्यायची आहे. याआधी काही म्यूटेशन आढळून आले असले तरी अनेक नवीन आहेत ज्यांचे तपशीलवार विश्लेषण करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.