मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Remdesivir चा काळाबाजार सुरूच! तब्बल 22 हजारांना विकत होते इंजेक्शन, पोलिसांना आवळल्या मुसक्या

Remdesivir चा काळाबाजार सुरूच! तब्बल 22 हजारांना विकत होते इंजेक्शन, पोलिसांना आवळल्या मुसक्या

कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Cases in Maharashtra) आणि रेमडेसिव्हीर-ऑक्सिजन यांचा तुटवडा (Shortage of Remdesivir and Oxygen) यामुळे काही अवैध कृत्यांमध्ये वाढ होते आहे. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार हे त्यापैकी एक..

बीड, 24 एप्रिल: कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Cases in Maharashtra) आणि रेमडेसिव्हीर-ऑक्सिजन यांचा तुटवडा (Shortage of Remdesivir and Oxygen) यामुळे काही अवैध कृत्यांमध्ये वाढ होते आहे. या कमतरता जाणवणाऱ्या घटकांचा काळाबाजार ही समस्या अधिक फोफावत आहे. मुंबई-पुण्यापाठोपाठा आता बीड जिल्ह्यापर्यंत देखील हे काळाबाजाराचं (Black Market of Remdesivir) लोण जाऊन पोहोचलं आहे. कित्येक पटींनी किंमत सांगत गरजूंना लुटलण्याचा प्रकार घडत आहे. राज्यातून अनेक ठिकाणाहून अशा बातम्या समोर आल्या आहेत, बीडही त्याला अपवाद नाही.

रेमडेसिव्हीरबाबत बीड जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार (Remdesivir Black Market in Beed District) होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यात आता अशी माहिती समोर आली आहे की तब्बल 22 हजारांना रेमडेसिव्ही इंजेक्शनची विक्री केली जात आहे. अशाप्रकारे 22 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकताना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी रात्री दोन तरुणांना पोलिसांनी पकडलं आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हे वाचा-गेल्या 24 तासात देशात 2621 रुग्णांचा मृत्यू, 8 राज्यांमधील परिस्थिती गंभीर)

तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना  दोघाना ताब्यात घेण्यात आले असून, श्रेयस बाबासाहेब नाईकवाडे (ता. धारूर) आणि कृष्णा ठोंबरे (रा.दहिफळ ता.केज) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांची नावं आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन आरोपींना पकडल्यानं काळाबाजारीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस आणखी सखोल तपास करत आहेत.

(हे वाचा-Tokyo Olympics 2021 संदर्भात मोठी बातमी; जपानमध्ये कोरोनामुळे आणीबाणी लागू)

रेमडीसीव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे त्रस्त झाले आहेत. अशा अटीतटीच्या प्रसंगी प्रशासनाला या काळाबाजाराला आळा घालण्यात अपयश आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे.

First published:

Tags: Beed, Beed news, Corona, Coronavirus