मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Updates: गेल्या 24 तासात देशात 2621 रुग्णांचा मृत्यू, 8 राज्यांमधील परिस्थिती गंभीर

Corona Updates: गेल्या 24 तासात देशात 2621 रुग्णांचा मृत्यू, 8 राज्यांमधील परिस्थिती गंभीर

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या 24 तासात देशात कोरोनाचे 345,147 नवे रुग्ण (Corona Cases in India) आढळले आहेत. तर, यादरम्यान 2621 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 एप्रिल : कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. देशातही कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार झपाट्यानं होत आहे. दररोज रुग्णसंख्येचा आणि मृतांचा नवा उच्चांक नोंदवला जात असून ही चिंताजनक बाब आहे. देशात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखाहून अधिक आणि आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या 24 तासात देशात कोरोनाचे 345,147 नवे रुग्ण (Corona Cases in India) आढळले आहेत. तर, यादरम्यान 2621 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही नवे उच्चांक गाठत आहे.

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 1,89,549 वर पोहोचली आहे. देशात 25,43,914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे संख्या एकूण बाधितांच्या 15.3 टक्के आहे. याआधी गुरुवारी कोरोनाचे नवे 3.32 लाख रुग्ण आढळले होते. तर, 2250 जणांचा मृत्यू झाला होता. भारतानं दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकलं असून भारत जगभरात पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

आज राज्यात 74,045 रुग्णांची कोरोनावर मात तर 66836 नवीन रुग्णांची नोंद

कोरोना संक्रमित रुग्णांच्या बरं होण्याचा दर 83.5 इतका झाला आहे. तर, कोरोनानं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा दर घटून 1.1 टक्के इतका झाला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 773 रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.. यानंतर दिल्ली 348, छत्तीसगड 219, यूपी 196, गुजरात 142, कर्नाटक 190, पंजाब 75 आणि मध्य प्रदेशमध्ये 74 जणांचा मृत्यू झाला आहे. या आठ राज्यांमध्येच 2017 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकूण मृतांच्या संख्येपैकी 76.98 टक्के इतका आहे.

कोरोनाचा विळखा; अहवालासाठी 4 ते 7 दिवसांचा वेळ, कुटुंबाला संसर्गाचा धोका

60 टक्क्याहून अधिक रुग्ण या 7 राज्यांमध्ये -

महाराष्ट्रात सर्वाधिक 66,836 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 2844, दिल्लीमध्ये 24331, कर्नाटक 26962, केरळ 28447, राजस्थान 15398 आणि छत्तीसगडमध्ये 17397 नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांच्या संख्येपैकी 60.24 रुग्ण याच सात राज्यांमधील आहेत.

First published:

Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus