नवी दिल्ली 23 ऑगस्ट : संपूर्ण जग सध्या कोरोना (Coronavirus) विषाणूविरूद्ध लढा देत आहे आणि या लढ्यात विषाणूविरोधातील सर्वात मोठं शस्त्र म्हणजे लस (Corona Vaccine) . जगभरात लसीकरणाचं (Vaccination) काम वेगानं केलं जात आहे. दुसरीकडे, शास्त्रज्ञ व्हायरस आणि लसीवर संशोधन करत आहेत. अशात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीनुसार, शास्त्रज्ञांना समजलं की लोक लसीचे डोस घेऊनही कोरोनाग्रस्त होत आहेत. परंतु हे लोक किती वेळा संसर्गाला बळी पडत आहेत हे स्पष्ट झाले नाही. या आकडेवारीमुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेले लोक इतरांना संक्रमित करू शकतात की नाही याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. आता या गोष्टीनंही चिंता वाढवली आहे की जे लस घेत आहेत ते देखील गंभीर आजारांना बळी पडू शकतात. लसीकरण झालेल्या लोकांना विषाणूची लागण का होत आहे, याबद्दल शास्त्रीय संशोधनाचा अभाव आहे. महाराष्ट्रात तिसरी लाट येणार का? विषाणूचा धोका कितपत? तज्ज्ञांचा मोठा खुलासा शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. लसीकरण केलेले लोक निर्भयपणे बाहेर फिरत आहेत. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन करत नाही. कोविडच्या नवीन लाटेच्या दरम्यान सर्व प्रकारचे निर्बंध काढून टाकणे हे संक्रमणाचे प्रमुख कारण असू शकते. हे अत्यंत चुकीचे निर्णय आहेत. कार्यक्रम आयोजित करणे आणि गर्दी जमा करणे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करणे आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे संसर्गाची काही वेगळी चित्रे आपल्यासमोर येत आहेत. Lockdown टाळायचा असेल तर कोणी कितीही चिथावल तरी त्याला दाद देऊ नका : मुख्यमंत्री लसीकरण झालेल्या लोकांना पुन्हा होणाऱ्या संसर्गाच्या संदर्भात, हेदेखील समोर येत आहे की ज्यांनी लस घेतली आहे, ते निष्काळजी आहेत. गर्दीच्या ठिकाणी सामील होणे. मास्कशिवाय बाहेर जाणे. नियमांकडे दुर्लक्ष करणे, या सर्वाचा परिणाम म्हणजे व्हायरस पुन्हा शरीरावर आक्रमण करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.