मराठी बातम्या /बातम्या /देश /

Corona Virus 3rd Wave: महाराष्ट्रात तिसरी लाट येणार का? विषाणूचा धोका कितपत? तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Corona Virus 3rd Wave: महाराष्ट्रात तिसरी लाट येणार का? विषाणूचा धोका कितपत? तज्ज्ञांचा मोठा खुलासा

ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते का? याबाबत मोठा खुलासा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते का? याबाबत मोठा खुलासा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

Corona Pandemic in India: ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा यापूर्वी तज्ज्ञांकडून (Expert's Opinion on 3rd wave) देण्यात आला होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 ऑगस्ट: मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून कोरोना विषाणूनं (Corona virus) संपूर्ण जगाला ग्रासलं आहे. कोरोना विषाणूबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनं देशाचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. तर लाखो लोकांचा जीवही घेतला आहे. अशात ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट (Corona Virus 3rd Wave Alert) येऊ शकते, असा इशारा यापूर्वी तज्ज्ञांकडून  (Expert's Opinion on 3rd wave) देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी केली आहे.

पण आता कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता धुसर झाल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली तरी, अन्या लाटांप्रमाणे कोरोना विषाणूची तिसरी लाट प्राणघातक नसेल, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनं यावर टिप्पणी करण्याचं टाळलं आहे. पण काही सदस्यांनी सांगितलं की, तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे. तिसरी लाट आलीच तर ती फार पसरणार नाही.

हेही वाचा-चमत्कार! 109 दिवस ECMO वर कोरोनाशी झुंज; लंग ट्रान्सप्लांटशिवायच रुग्ण ठणठणीत

अन्य एका टास्क फोर्सच्या सदस्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, देशात कोरोनाबाधित नवे रुग्ण कमी होतं आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र आणि केरळात कोरोना रुग्ण झपाट्यानं कमी होण्याची शक्यता आहे. तुरळक राज्य वगळता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही घटल्याचं संबंधित सदस्यानं सांगितलं आहे. शिवाय ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील लसीकरणाचा आकडा 65 कोटींपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते, असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा-कोरोनानंतर जगातील दुर्मिळ आजाराची लागण; सोलापूरातील डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

दुसरीकडे, इंडियन सार्स- कोविड 2 जीनोमिक्स कन्सोर्टियमचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितलं की, 'आणखी तीन आठवडे थांबा म्हणजे, तिसऱ्या लाटेबाबतचं चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरचं मी वास्तविक टिप्पणी करू शकेल.' तसेच 'कोरोना विषाणूची तिसरी एक लाट येणार की, नाही हे जाणून घेण्याबाबत निश्चित अशी पद्धत नाही. पण दुसऱ्या लाटेइतकी ती त्रासदायक नसेल, असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या यांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona virus in india, Maharashtra