मुंबई, 21 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, असे असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नाहीये. तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोना (Corona) आणि लॉकडाऊनचा (Lockdown) धोका जर टाळायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत. त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचा भयावह वातावरण न वाटता चांगल्या वातावरण तयार करण्यासाठी हे सेंटर उभारले आहेत. फक्त एक इशारा आणि मुलाचं रडणं बंद; आईने कशी केली जादू पाहा VIDEO मुख्यमंत्र्यांची राजकीय नेत्यांना विनंती आता सुद्धा मी गर्दी बघितली, ही गर्दी योग्य नाहीये. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. मी सर्वांना विनंती करतो, कोणतेही राजकीय स्वार्थ अथवा आपल्या स्वतःचे स्वार्थ यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असा वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो, आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असा काही करू नका. कोरोना संकट अजूनही टळले नही, आपल्याला हे टाळायचा आहे. आपण जर नियम पाळले नाहींतर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाहीये. तो ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजन जेव्हा कोविड रुग्णाला राज्यात लागेल तेव्हा कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोणीही कितीही चिथावलं असेल, भडकवलं तरी त्यांच्या चिथावणीला दाद देऊ नका असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.