मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Maharashtra Lockdown: राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री म्हणाले...

Maharashtra Lockdown: राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री म्हणाले...

Maharashtra Lockdown: 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आता हा लॉकडाऊन संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत.

Maharashtra Lockdown: 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आता हा लॉकडाऊन संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत.

Maharashtra Lockdown: 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आता हा लॉकडाऊन संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत.

मुंबई, 23 मे: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) जाहीर करण्यात आला. सुरुवातीला राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला त्यानंतर त्यात वाढ 1 जून 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आता हा लॉकडाऊन संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगतलं.

तसंच निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाचवेळी शिथिल होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टप्प्याटप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- BMCचा 'हा' प्रकल्प करणार यंदा दादरकरांची जलकोंडीतून सुटका

लॉकडाऊनसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री?

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौरा केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंर्दभात महत्त्वाचं वक्तव्य केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊन केवळ चार दिवस झाले. कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली आहे. मात्र गेल्या लाटेच्या वेळी तुम्ही अनुभव घेतला आहे. गेल्या वेळी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं. मात्र काही प्रमाणात शिथिलता आणली आणि त्यानंतर कोरोना चौपटीनं वाढला. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनचे काय परिणाम होतात हे पाहिलं जाईल. त्यानंतर निर्णय घेऊ. तसंच सध्याची परिस्थिती बघून लवकरच आढावा बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा करुन निर्बंध शिथील करायचे की नाही यावर निर्णय घेता येईल.

हेही वाचा- Pune Vaccination: जाणून घ्या आज पुण्यात कसं आहे लसीकरणाचे नियोजन

गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्याही घटलेली नाही. आता तिसऱ्या लाटेचा धोका पाहत ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आवश्यक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra News, Rajesh tope