मुंबई, 23 मे: दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतल्या हिंदमाता परिसरात जलकोंडी पाहायला मिळते. दरवेळी तिथे पूरपरिस्थिती निर्माण होत असून गुडघ्याभर पाणी साचतं. मात्र आता मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हिंदमाता येथील जलकोंडी या पावसाळ्यात फुटणार आहे. हिंदमाता येथील पावसाळ्यातील जलकोंडी फोडण्यासाठी महानगर पालिका भूमिगत टाक्या बांधत असून या टाक्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी या टाक्याचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी नगरसेविका उर्मिला पांचाळ, AMC वेलारुसु, HE खात्याचे इंजिनिअर्स यांच्यासह प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता उड्डाणपूल, सेंट झेवियर्स मैदान येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
नगरसेविका उर्मिला पांचाळ जी, AMC वेलारुसु जी, HE खात्याचे इंजिनिअर्स यांच्यासह प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता उड्डाणपूल, सेंट झेवियर्स मैदान येथे सुरू असलेल्या कामाची पाहाणी केली. हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी धरून ठेवण्यासाठी टाक्या बांधण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. pic.twitter.com/tDuwk6SaL7
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 22, 2021
दिलेल्या वेळआधी काम पूर्ण होत आले असून पावसाळ्यापूर्वी या टाक्या तयार असतील. या टाक्यामुळे हिंदमाता येथील पूरस्थिती कमी होणार असल्याचं शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- Pune Vaccination: जाणून घ्या आज पुण्यात कसं आहे लसीकरणाचे नियोजन या टाक्यामध्ये अतिवृष्टीच्या काळात पावसाचे पाणी 3 तास साठवण्याची क्षमता असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. कशा असेल भूमिगत टाकी हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचारा करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. तीन ठिकाणी भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरातील संत झेव्हिअर्स मैदानात भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. त्यानंतर हे पाणी परळ पासून दादर पश्चिमेकडील स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात आणण्यात येणार आहे. येथेही भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे.