जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / पुण्याचं Mission Vaccination, पहिल्या वहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्राचं उद्घाटन

पुण्याचं Mission Vaccination, पहिल्या वहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्राचं उद्घाटन

पुण्याचं Mission Vaccination, पहिल्या वहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्राचं उद्घाटन

Pune Mission Vaccination जिल्ह्यातलं ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनच पहिलं केंद्र सोमवारी हडपसरला सुरू करण्यात आलं. विठ्ठलराव तुपे नाट्य मंदिराच्या पार्टीमध्ये हे पहिलं ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्र असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 31 मे : जिल्ह्यातलं ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनच (Drive in Vaccination) पहिलं केंद्र सोमवारी हडपसरला (Hadapsar) सुरू करण्यात आलं. विठ्ठलराव तुपे नाट्य मंदिराच्या पार्टीमध्ये हे पहिलं ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन (Drive in vaccination) केंद्र असेल. इथं रोज शंभर जणांचं लसीकरण केलं जाणार आहे. केंद्राचं ऑनलाइन उद्घाटन करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुभेच्छा दिल्या. (वाचा- फक्त 45+ लोकांनाच मोफत कोरोना लस का?; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं ) अपंग वृद्ध दिव्यांग अशा अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रांवर लस घ्यायला गेल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागतो. इमारतींमध्ये असलेल्या लसीकरण केंद्रांवर जिन्याने अथवा लिफ्टने चढून जाणे आणि लस घेऊन पुन्हा खाली येणं हे जिकिरीचं ठरायचं. पण आता ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्राचा मोठा फायदा होणार आहे. पुण्यातली लसीकरणाची माहिती देताना मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सध्याची मनपाची 25 हजार डोस रोज देण्याची क्षमता वाढवून दहा दिवसांत 35 ते 50 हजार पर्यंत नेण्याचा दावा केला आहे.

जाहिरात

(वाचा- पुण्यातील विद्यार्थ्यांची भरारी; बनवलं जागतिक दर्जाचं ‘Oxygen Concentrator’ ) शहरातील सुमारे 31 लाख नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट मनपासमोर आहे. त्यापैकी तब्बल दहा लाख लोकांचा पहिला डोस पूर्ण झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली. ज्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्या वेगाने लसीकरण वाढवण्याची पूर्ण तयारी महापालिकेनं केली आहे. तब्बल तब्बल दीडशे केंद्रांवर लसीकरण करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. व्हॅक्सिनेश ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत आठ वेगवेगळ्या ॲम्बुलन्स मधून लसीकरण सुरू करण्यात आलं असून शहरातील भटके निराधार आणि भिक्षेकरी यांच्याही लसीकरणाची ची सोय या ॲम्बुलन्स द्वारे करण्यात आली आहे. त्यामुळं समाजातील कुठल्याही घटकाला लस मिळणार नाही असं होणार नाही असं आयुक्तांनी सांगितलं आहे. ज्यांची आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्रे नसतील अशांच्या लसीकरणासाठी ऑफलाइन नोंदणीचा पर्याय वापरण्यात येणार आहे. मात्र त्याच वेळी महापालिकेच्या 53 दवाखान्यातील लसीकरण थांबून थेट नगरसेवकांच्या ताब्यात लसीकरण केंद्र देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यावर मोठी टीका झाली आहे. मात्र स्थानिक संपर्क आणि नोंदींच्या दृष्टीने नगरसेवकांनाही सहभागी करून घेतलं असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात