Home /News /pune /

पुण्यातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी; विकसित केलं जागतिक दर्जाचं 'Oxygen Concentrator’

पुण्यातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी; विकसित केलं जागतिक दर्जाचं 'Oxygen Concentrator’

Pune News: पुण्यातील अभियांत्रिकीच्या (Pune Engineering student)चार विद्यार्थ्यांनी चक्क ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची निर्मिती (developed oxygen concentrator) केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व निकष पूर्ण करेल, असा उच्च दर्जाचं हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 31 मे: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत (Corona virus 2nd wave) देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा (Lack of oxygen) जाणवला आहे. देशाची ही गरज लक्षात घेऊन पुण्यातील अभियांत्रिकीच्या (Pune Engineering student)चार विद्यार्थ्यांनी चक्क ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची निर्मिती (developed oxygen concentrator) केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व निकष पूर्ण करेल, असा उच्च दर्जाचा हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असल्याचं मत या विद्यार्थ्यांचं आहे. आता या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरला केवळ प्रयोग शाळेच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर करण तरडे, निधी जगताप, चंद्रसेन गायकवाड आणि कार्तिक मांढरे या चार जणांनी मिळून विकसित केला आहे. संबंधित चार विद्यार्थ्यांनी आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 'अनश्वर टेक्नॉलॉजी' नावच स्टार्टअप सुरू केलं. याठिकाणी त्यांनी बंद पडलेल्या व्हेंटिलेटरचा ‘गॅस अ‍ॅनलायझर’ आणि कार्यशाळेतील काही साहित्य वापरून या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची निर्मिती केली आहे. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या त्यांनी वेगवेगळ्या चाचण्या देखील केल्या आहेत. 2 लिटरपासून अगदी दहा लिटरपर्यंत त्यांनी चाचण्या घेतल्या आहेत. हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चीन देशातून आयात केल्या जाणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपेक्षा अधिक सक्षम असल्याचं मत टीम लिडर करण तरडे यानं व्यक्त केलं आहे. हे ही वाचा-पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 मे.टन ऑक्सिजनची निर्मिती; 16 नवे प्रकल्प उभारणार हा कॉन्सन्ट्रेटर तयार झाल्यानंतर त्याचं परिक्षण करणं आवश्यक होतं. याच्या परिक्षणासाठी विविध संशोधन संस्थांमध्ये फेऱ्या मारल्या. मात्र त्यांच्याकडू आवश्यक ती मदत करण्यात आली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी एका गॅस अ‍ॅनलायझरद्वारे टेस्टींग कीटही स्वतःच विकसित केलं आहे. त्याद्वारे त्यांनी या कॉन्सन्ट्रेटरचं परिक्षण केलं असून हे कॉन्सन्ट्रेटर जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांवर खरा उतरेल असा दावाही या विद्यार्थ्यांनी केला आहे. हे ही वाचा-काकांना झालेला त्रास पुतणीला बघवला नाही, विकसित केलं मूव्हिंग टॉयलेट सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दर मिनिटाला 2 ते 10 लिटरपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह देऊ शकतो. त्याचबरोबर हवा शुद्धीकरणासाठी यामध्ये फोम अधारित तंत्रज्ञानही बसवण्यात आलं आहे. हा कॉन्सन्ट्रेटर खराब झाल्यास काळावं यासाठी अलार्मची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या कॉन्सन्ट्रेटरचं वजन 26 किलो असून यासाठी 750 वॅटचा विद्युत प्रवाह आवश्यक आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune news

    पुढील बातम्या