जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / देशात पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना? आठवड्यात दुप्पट झाला पॉझिटिव्हिटी रेट

देशात पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना? आठवड्यात दुप्पट झाला पॉझिटिव्हिटी रेट

file photo

file photo

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 3.4 टक्के इतका नोंदवला गेला आहे. एका आठवड्याआधी हा दर 1.68 टक्के इतका होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 जुलै : देशात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) काही प्रमाणात ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, दोन बाबी अजूनही चिंता वाढवत आहेत. पहिली तर ही की कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अजूनही 500 च्या आसपास कायम आहे आणि दुसरी बाब म्हणजे कोरोनाच्या प्रसाराचा दर आठवड्यातच दुप्पट झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 3.4 टक्के इतका नोंदवला गेला आहे. एका आठवड्याआधी हा दर 1.68 टक्के इतका होता. ही संख्या सध्या फार चिंताजनक नसली तरी ही संख्या घटण्याऐवजी वाढणं हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (3rd Wave of Coronavirus in India) संकेत असू शकतात. चीनचा पर्दाफाश! 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं उच्चांक गाठला होता, तेव्हा हा दर 18 ते 20 टक्के इतका जास्त होता. दुसरी लाट ओसरत असताना 20 जुलै रोजी हा दर केवळ दीड टक्के होता. मात्र, मागील सहा दिवसांमध्ये हा दर हळूहळू वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 26 जुलैपर्यंत हा आकडा 1.68 टक्क्यांवर पोहोचला. देशातील आठ राज्य अजूनही असे आहेत जिथे हा दर 5 ते 15 टक्क्यांच्या मध्ये आहे. तारीख आणि पॉझिटिव्हिटी रेट - 20 जुलै - 1.68 टक्के 21 जुलै - 2.27 टक्के 22 जुलै - 2.4 टक्के 23 जुलै - 2.12 टक्के 24 जुलै - 2.4 टक्के 25 जुलै - 2.31 टक्के 26 जुलै - 3.4 टक्के कोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान अचानक वाढू शकते रुग्णसंख्या - सर गंगाराम रुग्णालयातील मेडिकल विभागाच्या डड. पुजा खोसला यांचं असं म्हणणं आहे, की दुसऱ्या लाटेदरम्यान ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रसार वाढला होता, त्यानं हे शिकवलं की कधीही अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे, कोरोना आटोक्यात आला आहे, असं वाटलं तरीही लोकांनी हलगर्जीपणा करू नये आणि नियमांचं पालन करावं. दुसरीकडे सिरो सर्व्हेमध्ये अनेकांची शरीरामध्ये अँटीबॉडी आढळून आल्यानं विशेषतज्ञांना अशी आशा आहे, की दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी धोकादायक असेल किंवा याच मृत्यूचं प्रमाण कमी असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात