Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान

कोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान

आता लवकरच कोरोनावरील लशी इंजेक्शनऐवजी गोळ्यांच्या (Tablet) आणि इन्हेलरच्या (Inhaler) स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.

    नवी दिल्ली, 26 जुलै: गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि कोट्यवधी नागरिकांचे बळी घेणाऱ्या कोरोनावर (Corona Virus) सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इंजेक्शन (Injection) स्वरूपातील लशी (Vaccine) हाच एकमात्र बचाव आहे. आता लवकरच कोरोनावरील लशी इंजेक्शनऐवजी गोळ्यांच्या (Tablet) आणि इन्हेलरच्या (Inhaler) स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. स्वीडनमधील सर्वात मोठ्या सायन्स पार्कमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ एन्जेमो एंडरसन यांच्या नेतृत्वाखाली यावरचं संशोधन सुरु आहे. लवकरच बाजारात कोरोनावरील गोळ्या आणि इन्हेलर उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची बातमी बीबीसी वाहिनीनं दिली आहे. हे एक स्लिम इन्हेलर असेल, ज्याचा आकार आगपेटीतल्या एखाद्या काडीएवढा असेल, असं सांगण्यात आलं आहे. असं असेल इन्हेलर सर्वसामान्य नागरिक मेडिकलमधून एका पावडरच्या स्वरुपात असलेली लस घरी आणू शकतील. या इन्हेलरच्या वरच्या भागात बसवण्यात आलेली कुपी फोडल्यानंतर ते ऍक्टिव्हेट होईल. नाकावाटे हे इन्हेलर खेचल्यानंतर ते नाक, घसा आणि तोंडामार्फेत शरीरात प्रवेश करेल आणि कोरोनाविरोधातील अँटिबॉडिज वाढवायला मदत करेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. सामान्य तापमानात टिकण्याची क्षमता सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या लशींना कमी तापमानात किंवा फ्रिजिंगमध्ये ठेवावं लागतं. मात्र नव्याने बाजारात येणारी पावडरच्या स्वरुपातील लस ही 40 अंश तापमानातही टिकू शकेल. त्यामुळे सर्वसामान्य मेडिकलमध्ये किंवा घरातही ही पावडर टिकण्यात कुठलीही समस्या येणार नाही. तापमानात सातत्य राखता आलं नाही, तर सध्याच्या लिक्विड लशी खराब होतात. मात्र पावडर स्वरुपातील या लशींना तापमान बदलामुळे काहीही फरक पडणार नसल्याचं सांगितलं जात आहे. वाहतूक सोपी सध्या या पावडर स्वरुपातील लशीच्या चाचण्या सुरू असून लवकरच त्याचे निष्कर्ष येतील, अशी अपेक्षा आहे. या लशींना कोल्ड चेन मेंटेन करण्याचा प्रश्न नसल्यामुळे अफ्रिका खंडातील अनेक गरीब देशांपर्यंत त्या सहज पोहोचवणं शक्य होईल. त्याचप्रमाणं त्या देशांनाही या लशींचं वितरण करणं तुलनेनं सोपं होणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या