मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /चीनचा पर्दाफाश! 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण

चीनचा पर्दाफाश! 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण

 चीनमध्ये 2002 सालीच कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं.

चीनमध्ये 2002 सालीच कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं.

चीनमध्ये 2002 सालीच कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं.

बीजिंग, 26 जुलै: 2019 च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाव्हायरसचं (CoronaVirus) पहिलं प्रकरण समोर आलं. त्यानंतर हळूहळू इतर देशांमध्येही कोरोनाचे (Covid 19) रुग्ण आढळू लागले. जगभर हा व्हायरस पसरला. कोरोनाव्हायरस नेमका आला तरी कुठून हे अद्याप माहिती नाही, पण संशयाची सुई मात्र चीनकडेच आहे. एका थिअरीनुसार चीनच्या (China) वुहान (Wuhan) मीट मार्केटमधून (Meat market) आहे. तर दुसऱ्या थिअरीनुसार कोरोना हा वुहान लॅबमधून (Wuhan lab) पसरसल्याचं सांगितलं जातं आहे. चीनने मात्र आपल्या देशातून कोरोना पसरला हा आरोप फेटाळला आहे. याचदरम्यान आता चीनला अडचणीत टाकेल असं आणखी एक सत्य समोर आलं आहे.

डेली मेलच्या स्पेशल रिपोर्टनुसार चीनच्या बीजिंगमध्ये 2002 मध्येच कोरोनाव्हायरसचा पहिलं प्रकरण समोर आलं होतं. चीनच्या ग्वांगडोंगमध्ये अनेक रेस्टॉरंट्सचे शेफ आणि मीट मार्केटमधील विक्रेत्यांना याची लागण झाली होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास, ताप अशीच लक्षणं दिसत होती. यातील बहुतेक लोक मांस व्यापाराशी संबंधित होते. जे लोक या रुग्णांची काळजी घेत होते, त्यांनासुद्धा या आजाराची लागण झाली होती.

हे वाचा - काय? आता Fart मुळेही कोविडचा धोका! ढुसकी सोडली तरी पसरू शकतो कोरोना?

2002 मध्येच ही प्रकरणं समोर आली होती आणि त्यांची लक्षणं कोरोनासारखीच होती. जगभरात अशी  774 प्रकरणं आढळली होती. रिपोर्टनुसार, या रहस्यमयी आजाराने त्यावेळी डॉक्टरांची चिंता वाढवली होती. त्यावेळी यावर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं. नव्या रिपोर्टनुसार त्यावेळी हा आजसाठी मिळालेला अलर्ट होता, ज्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्यानंतर 2019  हा आजार वेगाने पसरला. आता मात्र यावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. याला चीनचं बायोलॉजिकल वेपन म्हटलं जातं आहे.

हे वाचा - कोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान

मेरीलँड युनिव्हर्सिटीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल अँड सिक्युरेटी स्टडीजचे वरिष्ठ संशोधक मिल्टन लीटेनबर्ग यांच्या मते, जगाला चुकीचे परिणाम, चुकीची सूचना आणि हेराफेरीचं कसं शिकार बनवता येऊ शकतं, हे चीनला सार्सने शिकवलं. यानंतर चीनने कोरोनाव्हायरसला जगात अगदी सहजुणे पसरवलं. आज चीनच्या षडयंत्राचा परिणाम असा आहे की जगातील कित्येक देश स्मशान झाले आहेत.

First published:

Tags: China, Corona, Corona patient, Corona spread, Coronavirus