'देव तारी त्याला कोण मारी', 3 मुलांसह महिलेकडून पाण्यात कोसळली कार; मात्र सर्वजण असे बचावले सुखरूप...पाहा VIDEO

'देव तारी त्याला कोण मारी', 3 मुलांसह महिलेकडून पाण्यात कोसळली कार; मात्र सर्वजण असे बचावले सुखरूप...पाहा VIDEO

महिला चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार पाण्यात पडल्याची घटना घडली.

  • Share this:

पुणे, 13 सप्टेंबर : 'देव तारी त्याला कोण मारी' असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र त्याचा प्रत्यय आज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आला आहे. राजगुरूनगर जवळच्या सातकरस्थळ गावाजवळून दुथडी भरून वाहणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरुन प्रवास करत असताना महिला चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार पाण्यात पडल्याची घटना घडली.

यावेळी माजी माहिला सरपंच साधना सातकर यांच्या सतर्कतेने 5 जणांचे प्राण वाचले आहेत. स्थानिक तरुणांच्या मदतीने कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह त्यांच्या आई वडिलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. पण पाण्याच्या प्रवाहात कार मात्र वाहून गेली आहे. हा सगळा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सातकर स्थळ येथे आज दुपारी माजी महिला सरपंच साधना सातकर आपल्या घरासमोर असताना त्यांनी ही कार पाण्यात पडताना पाहिली. साधना यांनी आरडा ओरड करत जवळच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावलं. यात साधना यांचे पती अशोक सातकर, संदीप सातकर, तुषार सातकर ,सुदर्शन मुळूक,माजी उपसरपंच सचिन सातकर, अविनाश खांगटे,ॠषीकेश सातकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यात उड्या मारल्या आणि कारचे दरवाजे उघडून कार मधील 3 चिमुरड्यांना व त्यांच्या आई वडिलांना बाहेर काढले.

कदाचित काही मिनिट जरी याकडे कुणाचं लक्ष गेलं नसतं तर खूप मोठा अनर्थ घडला असता. माजी सरपंच असलेली ही महिला आणि या स्थनिक तरुण या कुटुंबा साठी प्राणरक्षक ठरले आहेत. या कारमध्ये राजगुरूनगर येथील एका सोसायटीमधील रहिवासी असलेले शिक्षक गणेश मगर यांच्या पत्नी व 3 मुले असल्याचं समजले आहे. तर थोड्या वेळाने बुडालेली कार काही अंतरावर जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 13, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading