नवी दिल्ली 01 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रीपरिषदेची बैठक झाली. ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली. यात कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेच्या (3rd Wave of Coronavirus) भीतीबरोबरच इतरही बर्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार पीएम मोदी यांनी बैठकीत कोरोनाबाबत आरोग्य मंत्रालय, नागरी उड्डयन मंत्रालय, रस्ते व परिवहन मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयाचा आढावा घेतला. गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक कोणी केली? पाहा घटनेचा LIVE VIDEO पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितलं, की तुम्ही आपल्या लोकसभा मतदार संघात गेलात तर मास्क (Face Mask) वापरा आणि लोकांनाही मास्क वापरण्यासाठी जागरूक करा. असं समजू नका, की कोरोना आता गेला आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. नवीन कृषी कायद्यांवरुन किसान सभा आक्रमक, ठाकरे सरकारला दिला इशारा पंतप्रधान म्हणालं, की ‘तुम्ही सर्वांनी लसीकरणाचं काम सुरू करावं (PM Modi on Corona Vaccination). लस घेणाऱ्या लोकांसोबत रांगेत उभा राहा आणि लोकांना काय त्रास होत आहे ते पाहा. सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा तळागाळातल्या जनतेला कसा फायदा व्हावा यावर काम करा.’ पुढे मोदी म्हणाले, की ज्या प्रकल्पांसाठी त्यांनी पायाभरणी केली त्या प्रकल्पांचे उद्घाटनंही मंत्र्यानीच करावं. सर्व प्रकल्पांचं परीक्षण करा आणि त्यांची कामे पूर्ण होण्यास विलंब होणार नाही याची काळजी घ्या. याशिवाय पंतप्रधानांनी 75 वा स्वातंत्र्यदिन कसा संस्मरणीय बनवता येईल याविषयी चांगल्या सूचनाही मंत्र्यांना मागितल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.