Home /News /mumbai /

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक कोणी केली? पाहा घटनेचा LIVE VIDEO

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक कोणी केली? पाहा घटनेचा LIVE VIDEO

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे (BJP MLC) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त बुधवारी समोर आलं होतं. या घटनेचा व्हिडिओ (Video of Stone Pelting on BJP MLC Gopichand Padalkar's Car) आता समोर आला आहे.

पुढे वाचा ...
    तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई 01 जुलै : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे (BJP MLC) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त बुधवारी समोर आलं होतं. गाडीवर दगड फेकल्याने गाडीची काच फुटून मोठे नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, या घटनेचा व्हिडिओ (Video of Stone Pelting on BJP MLC Gopichand Padalkar's Car) आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकताना दिसून आला. गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला कऱण्यात आला. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, की बुधवारी सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात माझ्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर मड्डी वस्ती येथील बैठकीला मी पोहोचलो. ही बैठक झाल्यावर मी गाडीत बसून निघालो होतो त्याचवेळी एका व्यक्तीने गाडीवर हल्ला केला. सोलापूर येथे माझा कुणासोबतही वाद नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पडळकर पुढे म्हणाले, की माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही. गाडीच्या पुढे मोठा दगड मारण्यात आला. गाडीची काच फुटली आहे. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. अशात त्यांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Gopichand padalkar, Live video viral

    पुढील बातम्या