• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • Delta च्या वाढत्या संकटात Oxford ने वाढवलं टेन्शन; कोरोना लशीबाबत धक्कादायक रिपोर्ट

Delta च्या वाढत्या संकटात Oxford ने वाढवलं टेन्शन; कोरोना लशीबाबत धक्कादायक रिपोर्ट

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने फायझर (Pfizer-BioNTech) आणि अॅस्ट्राझेनेकाच्या (Oxford-Astrazeneca) कोरोना लशीबाबत रिपोर्ट जारी केला आहे.

  • Share this:
ब्रिटन, 19 ऑगस्ट : सध्या कोरोनाच्या (Coroan variant) डेल्टा व्हेरिएंटने (Delta variant) चिंता वाढवली आहे. कोरोनाची लस (Corona vaccine) घेतलेल्यांनाही डेल्टाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहे. त्यात आता ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने (Oxford university) कोरोना लशीबाबत दिलेल्या रिपोर्टने चिंतेच भर पडली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी केलेल्या एका नव्या अभ्यासात असं आढळून आलं आहे, की फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका (Oxford-Astrazeneca)  यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशी अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी आहेत. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस भारतात कोविशिल्ड (Covishield) या नावाने ओळखली जाते. पण या दोन्ही लशी कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्सपासून चांगलं संरक्षण देतात, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एक डिसेंबर 2020 ते 16 मे 2021 या कालावधीत 18 वर्षांवरच्या 3 लाख 84 हजार 543 स्वयंसेवकांच्या नाक आणि घशातून घेण्यात आलेल्या 25 लाख 80 हजार 21 नमुन्यांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. 17 मे 2021 ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत 3 लाख 58 हजार 983 स्वयंसेवकांच्या नाक आणि घशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांचाही अभ्यास त्यांनी केला. त्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांच्या या संशोधनाचा पीअर-रिव्ह्यू अद्याप व्हायचा आहे. हे वाचा - 'या' देशात आता लोकांना घ्यावा लागणार Vaccineचा बूस्टर शॉट कोविड-19चा संसर्ग होऊन गेल्यानंतर ज्यांनी लसीकरण (Vaccination) करून घेतलं, त्यांना संसर्ग होण्यापूर्वीच लसीकरण केलेल्यांच्या तुलनेत कोविड-19पासून अधिक संरक्षण मिळालं, असं संशोधनात आढळून आलं. तसंच लसीकरण झालेलं नाही अशा व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant of Corona) संसर्ग जेवढ्या पातळीत होतो, तेवढ्याच पातळीवरचा संसर्ग लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटच्या बाबतीत झाल्याचंही या संशोधनात आढळलं. म्हणजेच डेल्टा व्हेरिएंटवर या दोन्ही लशींचा प्रभाव कमी पडत असल्याचं यात आढळून आलं आहे. अल्फा व्हेरिएंटवर (Alpha Variant) मात्र या दोन्ही लशी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. कारण लसीकरण न झालेल्यांना अल्फा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास त्याची जेवढी पातळी गाठली जाते, त्यापेक्षा फारच कमी पातळी लशींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग झाल्यास आढळते, असं दिसून आलं. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या प्राध्यापिका सारा वॉकर यांनी सांगितलं, की लसीकरण झाल्यानंतर ज्यांना कोरोनाचा संसर्ग होतो, त्यांच्याकडून किती प्रमाणात संसर्ग दुसऱ्यांना होऊ शकतो, याचा अद्याप शोध लागायचा आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण लवकरात लवकर करून घेणं आवश्यक आहे, हे मात्र खरं, असंही त्यांनी नमूद केलं. हे वाचा - राज्यात दुसरी लाट नियंत्रणात पण धोका कायम! 3 जिल्हे देतायेत मोठ्या संकटाचे संकेत ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स, ब्रिटनचा आरोग्य आणि सोशल केअर विभाग यांचे संशोधकही या संशोधनात सहभागी झाले होते. मॉडर्नाच्या लशीच्या एका डोसचा डेल्टा व्हॅरिएंटवरचा प्रभाव अन्य लशींच्या एका डोसएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असंही संशोधनात आढळून आलं आहे. कोविड-19च्या नव्या स्ट्रेन्सवर फायझर-बायोएनटेकच्या लशीच्या दोन डोसचा सुरुवातीचा प्रभाव जास्त आहे; मात्र ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीच्या दोन डोसच्या प्रभावाच्या तुलनेत तो लवकर ओसरतो, असंही आढळलं आहे. चार ते पाच महिन्यांनंतर या दोन्ही लशींचा प्रभाव सारखाच असेल; मात्र दीर्घकालीन परिणाम अभ्यासण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. दोन डोसमधल्या कालावधीचा नवा संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रभावावर कोणताच परिणाम होत नसल्याचंही आढळलं आहे; मात्र प्रौढ किंवा वयोवृद्धांच्या तुलनेत लशींपासून तरुणांना मिळणारं संरक्षण अधिक आहे, असं संशोधनातून दिसून आलं आहे. हे वाचा - लसीकरणामुळे तयार झालेल्या Antibodies डेल्टा व्हेरिएंटसाठी किती महत्त्वाच्या? ऑक्सफर्ड विद्यापीठातले वरिष्ठ संशोधक कोएन पॉवेल्स यांनी सांगितलं, की डेल्टा व्हॅरिएंटच्या संसर्गाच्या बाबतीत लशीच्या दोन डोसमधल्या अंतराचा किंवा एकाऐवजी दोन डोस घेतल्याचा वेगळा काही प्रभाव पडत असल्याचं आढळलं नाही. लशीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी होत असला, तरी तो पूर्णतः नाहीसा होत नाही. तसंच, लसीकरण केलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तरी त्यांच्यापासून दुसऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होत नाही, यावर शिक्कामोर्तब झाल्याचंही त्यांनी सांगितलं. रीडिंग विद्यापीठातले असोसिएट प्रोफेसर सायमन क्लार्क यांनी सांगितलं, की फायझर आणि अॅस्ट्राझेनेका या दोन्ही कंपन्यांच्या लशी डेल्टा व्हॅरिएंटवर प्रभावी ठरत नसल्याचं या अभ्यासातून दिसून आलं आहे. एखाद्याला कोरोना संसर्ग झाल्यास त्याच्यात नैसर्गिकरीत्या जेवढी प्रतिकारशक्ती (Natural Immunity) तयार होईल, त्यापेक्षा जास्त संरक्षण डेल्टा व्हॅरिएंटच्या बाबतीत अॅस्ट्राझेनेकाची लस देऊ शकत नाही, ही काळजीची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं.
First published: