मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यात दुसरी लाट नियंत्रणात पण धोका कायम! 3 जिल्हे देतायेत मोठ्या संकटाचे संकेत

राज्यात दुसरी लाट नियंत्रणात पण धोका कायम! 3 जिल्हे देतायेत मोठ्या संकटाचे संकेत

राज्यावर कोरोनाचं संकट कायम

राज्यावर कोरोनाचं संकट कायम

Maharashtra corona cases : राज्यावर अद्यापही कोरोनाची टांगती तलवार आहे.

मुंबई,  19 ऑगस्ट : उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) सरकारने कोरोनाची दुसरी (Coronavirus in Maharashtra) लाट नियंत्रणात असल्याचं सांगितलं. शिवाय राज्यातील निर्बंधही शिथील (Maharashtra unlock) करण्यात आले आहेत. त्यामुळे थोडा दिसाला मिळाल आहे. पण अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला (Corona cases in Maharashtra) नाही. राज्यातील तीन जिल्हे अद्यापही कोरोनाचे हॉटस्पॉट (Corona hotspot) आहेत.

राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दैनंदिन प्रकरणं वाढतच आहेत. अहमदनगर (Ahmednagar corona), सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन वाढवलं आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. इथं दैनंदिन रुग्णांची संख्या 600 च्या वरच आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार अहमदगनरमध्ये सर्वाधिक 778 नवे रुग्ण सापडले आहेत.  यामागोमाग सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात अनुक्रमे 707 आणि  625  रुग्ण आहेत. मृत्यूचा आकडा पाहता साताऱ्यात सर्वाधिक 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नगर, सोलापुरात अनुक्रमे 11 आणि 5 रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे.

हे वाचा - धक्कादायक! चीनने खाण्यासाठी विकली कोरोना संक्रमित जनावरं; रिपोर्टमधून पोलखोल

या तीन जिल्ह्यांमध्ये अद्यापही कोरोना थैमान घालतो आहे. याचा अर्थ महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे निर्बंध शिथील झाले म्हणून आता कोरोना नाहीच असं समजून बेजबाबदारपणे वागणं चांगलंच महागात पडू शकतं. कोरोना नियमांचं कठोर पालन करायलाच हवं. नाहीतर या तीन जिल्ह्यांतील कोरोना कधी पुन्हा इतर जिल्ह्यांतही हातपाय पसरेल हे सांगू शकत नाही.

डेल्टा प्लसचंही संकट

राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे  रुग्णही वाढत आहेत. डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या 76 वर पोहचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव आणि मुंबईत आहेत.

कोणत्या जिह्यात डेल्टा प्लसचे किती रुग्ण

जळगाव - 13

रत्नागिरी - 15

मुंबई - 11

कोल्हापूर - 7

ठाणे, पुणे - प्रत्येकी 6

पालघर, रायगड - प्रत्येकी 3

नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग - प्रत्येकी 2

चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड - प्रत्येकी एक रुग्ण

हे वाचा - 'या' देशात आता लोकांना घ्यावा लागणार Vaccineचा बूस्टर शॉट

राज्य सरकार आणि आरोग्य विभाग ICMR ने दिलेल्या प्रोटोकॉल नुसार सर्व काळजी घेत असून सर्व डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या कोरोना रुग्णांना आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या डेल्टा व्हेरिएंटची बाधा झालेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच सुद्धा अलगीकरण करण्यात येत आहे त्यामुळे मात्र घाबरण्याचे कारण नाही असं आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Corona hotspot, Coronavirus, Maharashtra, Satara, Solapur