मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /डेल्टा व्हेरिएंटवर लसीकरणापासून तयार झालेल्या Antibodies सक्षम, अमेरिकच्या अभ्यासात उघड

डेल्टा व्हेरिएंटवर लसीकरणापासून तयार झालेल्या Antibodies सक्षम, अमेरिकच्या अभ्यासात उघड

Corona Virus Delta Variant: ही बाब पत्रिका इम्यूनिटीमध्ये प्रकाशित एक अहवालात मांडण्यात आली आहे. या अहवालानुसार हे स्पष्ट करण्यास मदत करू शकते की, लसीकरण झालेले बहुतेक लोक धोकादायक डेल्टा व्हेरिएंटच्या संक्रमणापासून का बचावले?

वॉश्गिंटन, 19 ऑगस्ट: कोविडविरोधी लसीकरणानं (Corona Vaccination) तयार झालेल्या अँटीबॉडीज (Antibodies)पासून कोरोना व्हायरसचा (Corona Virus) डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) बचाव करु शकत नाही. ही बाब पत्रिका इम्यूनिटीमध्ये प्रकाशित एक अहवालात मांडण्यात आली आहे. या अहवालानुसार हे स्पष्ट करण्यास मदत करू शकते की, लसीकरण झालेले बहुतेक लोक धोकादायक डेल्टा व्हेरिएंटच्या संक्रमणापासून का बचावले? हा अभ्यास अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केला आहे. ज्यात फायझरची कोविडविरोधी लस घेतलेल्या लोकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजचे मूल्यांकन केले गेले आहे.

अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोना व्हायरसचे डेल्टा व्हेरिएंट कोविडविरोधी लसीकरणाद्वारे तयार होणाऱ्या अँटीबॉडीजपासून वाचू शकत नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक आणि संशोधनाचे सह-वरिष्ठ लेखक जॅको बून म्हणाले, डेल्टानं अन्य व्हेरिएंट्सला मागे टाकलं आहे. याचा अर्थ असा नाही की हा व्हेरिएंट अन्य प्रकाराच्या तुलनेत आपल्या अँटीबॉडीजवर वेगानं हल्ला करेल. पुढे ते म्हणाले की, डेल्टा व्हेरिएंट लसीला मात करू शकतो याचा कोणताही पुरावा नाही.

तालिबानची क्रूरता, लोकांवर भररस्त्यात हल्ला; काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार 

अमेरिकेत बूस्टर शॉट्स

डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढतोय. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं (America) मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता अमेरिकेनं लसीकरणाबाबत (Vaccination) मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत आता लोकांना कोरोना लसीकरणाचे बूस्टर शॉट्स (Booster shots) देण्यात येतील. कोविड -19 लसीकरणाची प्रभावीता कालांतराने कमी होत आहे.

'कमेंट करुन करत होते विनवणी, पण ऐकला नाही तो', ST समोर येऊन केली आत्महत्या

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी असा इशारा दिला की, त्यांनी 20 सप्टेंबरपासून सर्व अमेरिकन लोकांसाठी बूस्टर शॉट्स अधिकृत केले आहेत. लसीचा बूस्ट शॉट व्यक्तीचं पूर्णपणे लसीकरण झाल्यानंतर आठ महिन्यांनी लागू होतो.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus