पॅरिस, 20 एप्रिल : संसर्गजन्य महामारी कोरोना विषाणूमुळे आणखी एक मोठा धोका निर्माण झाला आहे. फ्रान्सच्या पॅरिस शहरात कोविड -19 विषाणू पाण्यातही सापडला आहे. शहराच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. ऑफिसर सेलिया ब्लाउल यांनी सांगितले की पॅरिसच्या गैर पिण्यायोग्य पाण्यामध्ये नवीन कोरोना विषाणूचे सूक्ष्मजीव सापडले आहे. हे पाणी रस्ते वगैरे साफ करण्यासाठी वापरले जाते. सध्या पिण्याच्या पाण्याचे दूषित होण्याचा कोणताही धोका नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सेलिया ब्लाउल म्हणाले की, पॅरिस वॉटर अथॉरिटी प्रयोगशाळेत राजधानीच्या आसपास गोळा झालेल्या 27 नमुन्यांपैकी चार नमुन्यांमधील सूक्ष्मदर्शक विषाणूचे प्रमाण आढळले. खबरदारी म्हणून ही केंद्रे त्वरित बंद केली गेली. याची उच्च पातळीवर चौकशी केली जात आहे. असं वृत्त 'लाईव्ह हिंदुस्तान'ने दिलं आहे.
ALERT! महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये समोर आले धक्कादायक आकडे, कोरोनाच कहर वाढला
त्याच वेळी, कोरोना विषाणूची लागण करणारे केंद्र असलेल्या चीनला कमी जोखीमचे क्षेत्र घोषित केले गेले आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी शहरात संक्रमित आणि मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात कोरोना संसर्गाची 16 नवीन प्रकरणे आहेत.
चीनच्या स्टेट काउन्सिलच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवीन प्रकरणांच्या आधारे जोखमीचे मूल्यांकन केले जाते. ज्या शहरांमध्ये, काउंटी आणि जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांत कोणत्याही नवीन प्रकरणांची पुष्टी झालेली नाही त्यांना कमी जोखीम असलेल्या क्षेत्रामध्ये वर्गीकृत केले जाते. जेथे 50 पेक्षा कमी किंवा जास्त प्रकरणे आहेत, रोग पसरत नाही, त्यांना मध्यम जोखीम म्हणून वर्गीकृत केले जाते. जेथे 50 हून अधिक केसेस आहेत आणि हा रोग पसरत आहे, त्यांना उच्च जोखीम असलेले क्षेत्र मानले जाते.
देशात कोरोना रुग्णांचा आकडा 17,265 वर; 24 तासांच वाढले 1553 संक्रमित, 543 मृत्यूसंपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.