बॉलिवूड अभिनेत्री फिटनेससाठी बराच वेळ जिममध्ये घाम गाळतात. पण एकदम फिट दिसणाऱ्या तारा सुतारियाला जिममध्ये जाणं फारसं आवडत नाही. त्यामुळे तिच्या या सोप्या टिप्स तुम्ही लॉकडाऊनमध्ये नक्की फॉलो करु शकता.
‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ताराचा या क्षेत्रात कोणीही गॉडफादर नाही. मात्र तरीही तिला इथल्या संस्कृतीची चांगली समज असलेली दिसून येते.
डाएटपेक्षा आपल्याला शिस्त जास्त महत्त्वाची वाटत असल्याचं तारा सांगते. ती कोणताही व्यायाम किंवा जीम करत नाही.
तारा कोणत्याही प्रकारचं खास डाएट फॉलो करत नाही पण काही बाबतीत तिनं स्वतःला शिस्त लावली आहे आणि ती त्या गोष्टी काटेकोरपणे पाळते.
ताराच्या जेवणात सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश असतो. तिचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला असल्यानं ती तिच्या कामाविषयी खूपच शिस्तप्रिय आहे
याशिवाय ती सिनेमाच्या शूटिंग दरम्यान भात खात नाही. तसेच साखर आणि भात या दोन्ही गोष्टींपासून ती दूर असते.
ज्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची शक्यता असते असे कोणतेही पदार्थ तारा खात नाही. यापेक्षा ती साधं जेवण आणि फळं घेते.