Home /News /coronavirus-latest-news /

जगभरात शेकडो Coronavirus, आतापर्यंत 7 मानवासाठी ठरले घातक

जगभरात शेकडो Coronavirus, आतापर्यंत 7 मानवासाठी ठरले घातक

कोरोना (corona) हा आरएनएन व्हायरसचा (virus) एक गट आहे, जो प्राणी आणि माणसांना आजारी पाडत आहे.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल : सध्या एका कोरोनाव्हायरसने (coronavirus) जगभर थैमान घातलं आहे, मात्र असे शेकडो कोरोनाव्हायरस असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोना हा आरएनएन व्हायरसचा एक गट आहे, जो प्राणी आणि माणसांना आजारी पाडत आहे.  काही कोरोनाव्हायरस हे प्राण्यांकडून माणसांमध्ये येतात. आतापर्यंत 7 कोरोनाव्हायरस माणसांसाठी जीवघेणे ठरलेत, अशाच व्हायरसबाबत इंडियन एक्स्प्रेसने माहिती दिली आहे. ओसी 43 (OC43) - वायरोलॉजी जर्नलमध्ये म्हटल्यानुसार पहिला मानवी कोरोनाव्हायरस 1965 साली शोधण्यात आवा आणि टायरेल, बायनो यांनी पेपरमध्ये याचा उल्लेख बी814 केला. या व्हायरसची लागण झाल्यास सामान्य सर्दीसारखी लक्षणं दिसतात, शिवाय पोटात जळजळही जाणवते. 229 ई (229E) - डी हॅम्रे आणि जे. जे. प्रॉकनाऊ यांनी एक्सपेरिमेन्टल बायोलॉजी अँड मेडिसीन या रिसर्च पेपरमध्ये 1966 साली सर्वात पहिला कोरोनाव्हायरस 229 ई चा उल्लेख होता. या व्हायरसची लागण झाल्यास सामान्य सर्दीसारखी लक्षणं दिसतात. एनएल 63 (NL63) - नेदरलँडमध्ये श्वसनसंबंधी आजार निर्माण करणाऱ्या पहिलं प्रकरण समोर आलं, त्यानंतर संशोधन सुरू झालं. 2004 साली एनएल 63 व्हायरस समोर आला. या व्हायरसची लागण झाल्यास श्वसनमार्गातील संक्रमण आणि न्यूमोनियासारखी श्वसनसंबंधी गंभीर समस्या दिसतात. एच के यू1 (HKU1) - 2004 साली हाँगकाँगमध्ये या व्हायरसची ओळख पटली. सार्स (SARS-CoV) - 2003 साली चीनमध्ये हा व्हायरस दिसून आला, तो कोणत्या प्राण्यापासून पसरला अद्याप माहिती नाही मात्र वटवाघळाकडून मांजरांमार्फत माणसांपर्यंत पोहोचला असं मानलं जातं. यामध्ये सामान्य खोकला, श्वसनात त्रास, डायरिया अशी लक्षणं दिसतात. मर्स (MERS) - 2014 मध्ये सौदी अरबमध्ये उंटांमार्फत माणसांमध्ये मर्स रूपात कोरोनाव्हायरस आला. खोकला, ताप, श्नास घेण्यात त्रास अशी लक्षणं आहेत. सार्स-कोव-2 (SARS-CoV-2) - चीनच्या वुहान शहरात कोविड 19 चा उद्रेक झाला. हा व्हायरसही कोणत्या प्राण्यामार्फत आला अद्याप स्पष्ट नाही मात्र वटवाघळाला त्याचा स्रोत मानलं जात आहे. सर्दी, ताप, खोकला अशा सामान्य लक्षणांसह घशात वेदना, नाक वाहणं, डायरिया अशी लक्षणंही दिसतात. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या