नाशिक, 29 एप्रिल: नाशिकमध्ये कोरोनाची (Coronavirus in Nashik) परिस्थिती बिकट आहे. कोरोनाचा आकडा सर्वाधिक असणाऱ्या संपूर्ण देशातील शहरांमध्ये नाशिकचा देखील क्रमांक लागतो. अशा परिस्थिती ग्रामीण भागासह शहरातील आरोग्य यंत्रणा अत्यंत ताणाखाली काम करत आहे. असं असूनही रुग्णालयांची तोडफोड केल्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. नाशिक शहरातही काही वेगळं चित्र नाही आहे.न नाशिकमध्ये पुन्हा एकदा एका रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी हा हल्ला केला आहे. कोरोनाची भीषण परिस्थिती नाशिकमध्ये असताना, आधीच रुग्णालय प्रशासनावर ताण आहे त्यात नातेवाईकांच्या अशाप्रकारच्या भूमिकांना देखील त्यांना सामोरं जावं लागत आहे. नाशिक रोड भागात असलेल्या रेडीयंट प्लस रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी देखील अशीच घटना याठिकाणी घडली होती. साधारण 15 दिवसांत दुसऱ्यांदा या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
(हे वाचा-What an Idea! ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता Parlours, या जिल्हात खास सुविधा)
कोरोना रुग्ण दगावल्याने टोकाचं पाऊल उचलत त्याच्या नातेवाईकांनी थेट रुग्णालयाची तोडफोड केल्याने आरोग्य यंत्रणा काही वेळासाठी कोलमडल्याचं या रुग्णालयात दिसून आलं. केवळ याच ठिकाणी नाही तर गेल्या तीन दिवसात नाशकात तीन वेगवेगवेळ्या रुग्णालयात अशीच घटना घडली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित नातेवाईकांचा उद्रेक नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे.
नाशिकमध्ये रुग्णालयात बेडच उपलब्ध नाही
नाशिकमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि बेडसाठी धावाधाव यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते आहे. पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाबाहेर रुग्म बेडसाठी ताटकळत आहेत. खाजगी हॉस्पिटलमध्ये O2 बेड नसल्यानं बधितांना केवळ सरकारी रुग्णालयाचा आधार आहे मात्र, रुग्णालयं हाऊसफुल्ल असल्यानं बेडसाठी रुग्णांची गर्दी देखील वाढते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus cases, Nashik