मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'कृपया कोरोना लस वाया घालवू नका', महाराष्ट्राकडे फक्त 10 दिवसांचाच साठा असताना मोदींची कळकळीची विनंती

'कृपया कोरोना लस वाया घालवू नका', महाराष्ट्राकडे फक्त 10 दिवसांचाच साठा असताना मोदींची कळकळीची विनंती

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकिकडे लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र कोरोना लस (corona vaccine) वाया घालवली जात आहे, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) लक्ष वेधलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकिकडे लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र कोरोना लस (corona vaccine) वाया घालवली जात आहे, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) लक्ष वेधलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकिकडे लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र कोरोना लस (corona vaccine) वाया घालवली जात आहे, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) लक्ष वेधलं आहे.

नवी दिल्ली, 17 मार्च :  एकिकडे देशात कोरोना प्रकरणं (Coronavirus in India) झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट (Coronavirus in Maharashtra) झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र कोरोना लस (corona vaccine) वाया घालवली जात आहे, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लक्ष वेधलं आहे. कृपया कोरोना लस (covid 19 vaccine) वाया घालवू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. पण आता राज्यात फक्त दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडे त्यांनी लशीची मागणीदेखील केली आहे. दरम्यान काही राज्यांमध्ये मात्र लस वाया घालवली जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

देशातील कोरोना परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.  त्यावेळी त्यांनी लस वाया जात असल्याकडेही लक्ष वेधलं. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये कोरोना लस वाया जात असल्याचं त्यांनी सांगितलं. लस का वाया जाते आहे, याकडेदेखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. कृपया लस वाया घालवू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हे वाचा - ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला तर..., पंतप्रधानांनी व्यक्त केली भीती

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याशी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा हजर होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.

राजेश टोपे यांनी सांगितलं, 'आपण 3 लाख लस देण्याच्या गतीने काम सुरू केले आहे. त्यासाठी लशीचा पुरवठा मिळणे गरजेच आहे. त्यामुळे 20 लाखांची लशी राज्याला मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राजेश भूषण यांना केली आहे.  पण, केंद्रीय मंत्र्यांकडून आपल्यावर टीका करण्यात आली आहे की लशीचा साठा उरलेला आहे. पण जर 3 लाख लशी देण्याचे नियोजन केले आहे तर फक्त 10 दिवसांचा लशीचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे'

हे वाचा - corona vaccine वरुन केंद्र आणि ठाकरे सरकारमध्ये वाद, राजेश टोपेंनी दिले उत्तर

'आम्ही राज्यात कोरोना लसीकरणासाठी गती वाढवली आहे. 20 लाख डोस दररोज देण्यावर आमचा भर आहे.  त्यासाठी मोठाले सेंटर उभारावे लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यासाठी परवानगी द्याव्यात, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली. 'ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे लसीकरण केले जात आहे, पण रुग्णालयांकडून प्रतिसाद दिल जात नाही अशा रुग्णालयांची यादी आम्ही केंद्राकडे देणार आहोत', असंही टोपे यांनी सांगितले.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Covid19, India, Lifestyle, PM narendra modi, Uddhav thacakrey