मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : Omicron डेल्टापेक्षा खरंच घातक आहे का; लशींच्या प्रभावाबाबत काय म्हणाले शास्त्रज्ञ?

Explainer : Omicron डेल्टापेक्षा खरंच घातक आहे का; लशींच्या प्रभावाबाबत काय म्हणाले शास्त्रज्ञ?

हा व्हॅरिएंट आढळून अजून काही दिवसच झाले आहेत, तोपर्यंत त्यात तब्बल 50 वेळा म्युटेशन झालं आहे. या म्युटेशनमुळेच (Omicron Mutation) हा व्हॅरिएंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं समजलं जात आहे.

हा व्हॅरिएंट आढळून अजून काही दिवसच झाले आहेत, तोपर्यंत त्यात तब्बल 50 वेळा म्युटेशन झालं आहे. या म्युटेशनमुळेच (Omicron Mutation) हा व्हॅरिएंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं समजलं जात आहे.

हा व्हॅरिएंट आढळून अजून काही दिवसच झाले आहेत, तोपर्यंत त्यात तब्बल 50 वेळा म्युटेशन झालं आहे. या म्युटेशनमुळेच (Omicron Mutation) हा व्हॅरिएंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं समजलं जात आहे.

नवी दिल्ली 01 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळे (New Corona Variant) जगभरातल्या यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या आहेत. ओमिक्रॉन (Omicron Variant) या व्हॅरिएंटचा प्रसार डेल्टा व्हॅरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने होत असल्यामुळे (Omicron more transmissible) जगभरात याबद्दल भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा व्हॅरिएंट आढळून अजून काही दिवसच झाले आहेत, तोपर्यंत त्यात तब्बल 50 वेळा म्युटेशन झालं आहे. या म्युटेशनमुळेच (Omicron Mutation) हा व्हॅरिएंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं समजलं जात आहे.

ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अद्याप कमी असल्यामुळे याबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही. तरी जेवढी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार तरी हा डेल्टापेक्षा जास्त शक्तिशाली (Omicron deadlier than Delta) समजला जातो आहे. त्यामुळेच कोविड-19 आणि त्याच्या डेल्टा व्हॅरिएंटला डोळ्यासमोर ठेवून बनवल्या गेलेल्या कोरोना प्रतिबंधक लशी ओमिक्रॉनवर कितपत प्रभावी ठरतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच मॉडर्ना या ब्रिटिश लस उत्पादक कंपनीनेदेखील (Moderna vaccine) सध्याची लस ओमिक्रॉन विरुद्ध कमी प्रभावी ठरू शकते असं म्हटलं आहे. हा व्हॅरिएंट नेमका कसा आहे आणि सध्याच्या लशी याविरोधात का प्रभावी ठरणार नाहीत याबाबत इथे थोडी चर्चा केली आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, हा आतापर्यंतचा सर्वांत वेगाने म्युटेट होणारा व्हॅरिएंट आहे. WHO ने व्हॅरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीमध्ये याचा समावेश केला आहे. कोरोना विषाणू त्याच्या स्पाइक प्रोटीनच्या (Omicron Spike Protein mutation) माध्यमातून मानवी पेशींमध्ये शिरण्यासाठी जागा बनवतो. सध्या उपलब्ध असणाऱ्या लशी स्पाइक प्रोटीनच्या विरोधातच अँटीबॉडी (Antibodies against spike protein) तयार करतात, जेणेकरून या स्पाइक प्रोटीनशी लढण्यास आपलं शरीर सक्षम होईल आणि विषाणू आपल्या शरीरामध्ये दाखल झाला, तरी नुकसान होणार नाही.

ओमिक्रॉनच्या याच स्पाइक प्रोटीनमध्ये आतापर्यंत 30 पेक्षा अधिक म्युटेशन्स (Omicron Mutation) पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे कोविड-19 आणि डेल्टाच्या स्पाइक प्रोटीनचा अभ्यास करून त्याविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लस ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनविरुद्ध कितपत लढा देऊ शकेल याबाबत संशोधकांना शंका आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात सध्या आठ लशींच्या वापराला मंजुरी (WHO Approved Vaccines) दिली आहे. यामध्ये मॉडर्ना, फायझर-बायोएनटेक, कोव्हिशिल्ड, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन, कोव्हॅक्सिन, सिनोव्हॅक कोरोनाव्हॅक, सिनोफॉर्म आदी लशींचा समावेश आहे. या सर्व लशी एकसारखं काम करत नाहीत. यातल्या काही लशी एमआरएनए लशी (mRNA Vaccines) आहेत, काही व्हायरल व्हेक्टर (Viral Vector vaccines) , तर काही इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated vaccines) या प्रकारात मोडतात. या सर्व लशींची काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. या सर्व लशी कशा काम करतात ते पाहू.

मेसेंजर आरएनए : या लशींमध्ये मेसेंजर आरएनए (mRNA) कोड असतो. तो शरीरात जाऊन कोरोना विषाणूच्या प्रोटीनची नक्कल तयार करतो. लसीकरण झाल्यानंतर तुमची इम्युन सेल स्पाइक प्रोटीनचे तुकडे तयार करण्यास सुरुवात करते. यामुळे तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होऊ लागतात. त्यामुळे भविष्यात कधी तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली, तर याच अँटीबॉडी विषाणूशी लढतात. मॉडर्ना आणि फायझर कंपन्यांच्या लशी मेसेंजर आरएनए लशी आहेत.

व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन : या लशींना वाहक लशी म्हणू शकतो. यामध्ये आपल्या शरीराला नुकसान न पोहोचवण्याऱ्या अॅडेनोव्हायरसला व्हायरल व्हेक्टरच्या (Viral Vector) स्वरूपात शरीरात सोडलं जातं. हा व्हायरस जेव्हा तुमच्या पेशींपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यांना तो स्पाइक प्रोटीन बनवण्याची सूचना देतो. तुमच्या पेशींवर स्पाइक प्रोटीन बनायला सुरुवात होताच, त्याला प्रत्युत्तर म्हणून तुमची इम्युन सिस्टीम अँटीबॉडी आणि डिफेन्सिव्ह व्हाइट सेल्स बनवण्यास सुरुवात करते. पुढे याच अँटीबॉडीज कोरोना विषाणू शरीरात दाखल झाल्यास त्याविरुद्ध लढा देतात. कोव्हिशिल्ड, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सन या व्हायरल व्हेक्टर लशी आहेत.

इनअॅक्टिव्हेटेड लशींमध्ये नावाप्रमाणेच मृत किंवा इनअॅक्टिव्हेटेड विषाणूचा वापर केला जातो. हा विषाणू मल्टिप्लाय होऊ शकत नाही किंवा यामुळे तुम्ही आजारीही पडू शकत नाही. एखाद्या सामान्य इन्फेक्शनप्रमाणे हा विषाणू काम करतो. त्यामुळे त्यानुसार अँटीबॉडीज तयार होतात. कोव्हॅक्सिन, सिनोव्हॅक कोरोनाव्हॅक आणि सिनोफॉर्म या इनअॅक्टिव्हेटेड लशी आहेत.

लशींबाबत माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल, की या सर्व लशी कोरोनाच्या मूळ विषाणूवर किंवा डेल्टा व्हॅरिएंटवर आधारित आहेत. त्यामुळेच आता नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटशी सामना करण्यासाठी या कितपत फायदेशीर ठरतील याबाबत शंका असल्याचं मत मॉडर्ना या लस उत्पादक कंपनीचे सीईओ स्टीफन बेंसल (Moderna CEO insists on need of modified vaccine) यांनी फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना व्यक्त केलं. तसंच, या नव्या व्हॅरिएंटसाठी कंपन्यांना आपापल्या लशींमध्ये सुधारणा करणं गरजेचं असणार आहे. मोठ्या प्रमाणात हे मॉडिफाइड डोस (Modified vaccine for Omicron) तयार करण्यासाठी कंपन्यांना कित्येक महिने लागू शकतात असंही बेंसल यावेळी म्हणाले.

नव्या किंवा सुधारित लशीची गरज पडल्यास मॉडर्ना 2022च्या पहिल्या काही महिन्यांमध्येच नवीन लस बाजारात आणू शकेल, असा दावा कंपनीचे चीफ मेडिकल ऑफिसर पॉल बर्टन यांनी केला आहे. फायझरनेही (Pfizer modified vaccine) गरज पडल्यास आम्ही सहा आठवड्यांमध्ये नवीन लस बनवू आणि 100 दिवसांच्या आत याचे सुरुवातीचे डोस उपलब्ध करू, असं स्पष्ट केलं आहे.

एकंदरीत या नव्या व्हॅरिएंटबद्दल अद्याप जास्त माहिती उपलब्ध नसली, तरी जगभरातल्या लस उत्पादक कंपन्या या व्हॅरिएंटशी सामना करण्यासाठी तातडीने सुधारित लस उत्पादन करण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान, हा विषाणू कितपत घातक आहे याबाबत आपल्याला अद्याप माहिती नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. हा विषाणू केवळ अधिक संसर्गजन्य आहे, तो डेल्टाच्या तुलनेत तितका घातक नसल्याचं कित्येक संशोधकांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccine