• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • ब्रिटनपाठोपाठ रशियामध्येही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; भविष्यात वाढवणार चिंता?

ब्रिटनपाठोपाठ रशियामध्येही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; भविष्यात वाढवणार चिंता?

AY.4.2 सबव्हेरिएंटची प्रकरणे इंग्लंडमध्ये वाढत आहेत. ब्रिटेनमध्ये 27 सप्टेंबरपासून वाढलेल्या रुग्णसंख्येत 6 टक्के प्रकरणं याच व्हेरिएंटची आहेत.

 • Share this:
  मॉस्को 22 ऑक्टोबर : रशियामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Covid-19 Delta Variant) सबव्हेरिएंटची (Sub Variant of Delta) अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असं म्हटलं जात आहे की हा प्रकार पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक ठरू शकतो. कामिल खाफिजोफ नावाच्या संशोधकाने सांगितलं की AY.4.2 चा सबव्हेरिएंट सुमारे 10 टक्के अधिक प्राणघातक आहे, ज्यामुळे रशियामध्ये अनेक नवीन प्रकरणे (Corona Cases in Russia) आणि मृत्यू नोंदवले जात आहेत. मात्र, सध्या त्याच्या प्रसाराची गती मंद आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं की कोरोनाच्या या व्हॅरिएंटविरोधात लस (Corona Vaccine) प्रभावी आहे. लहान मुलांच्या लसीकरणाविषयी मोठी बातमी! COVOVAX ला या महिन्यात मिळणार मान्यता AY.4.2 सबव्हेरिएंटची प्रकरणे इंग्लंडमध्ये वाढत आहेत. ब्रिटेनमध्ये 27 सप्टेंबरपासून वाढलेल्या रुग्णसंख्येत 6 टक्के प्रकरणं याच व्हेरिएंटची आहेत. यूके आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या रिपोर्टमध्ये 15 ऑक्टोबरला हा खुलासा केला गेला आहे. ब्रिटेनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी बुधवारी म्हटलं, की सध्या असं समजण्याचं काही कारण नाही की हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो. रशियाचे इम्यूनोलॉजिस्ट निकोले क्रुश्कोव म्हणाले, डेल्टा आणि त्याचे सबव्हेरिएंट भविष्यातही प्रभावीच राहतील. हे व्हेरिएंट काही प्रकारच्या लसींनाही अप्रभावी करू शकतात. विशेषत: जेथे लसीकरण दर 50 टक्क्यांपेक्षा कमी किंवा जवळजवळ समान आहे. ते म्हणाले की तरीही यात काही मोठा बदल होईल असे वाटत नाही. कारण कोरोनाव्हायरसची देखील एक मर्यादा आहे आणि कोरोनाचे रुद्र रूप याआधीच पाहायला मिळालं आहे. जबरदस्त! भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा: 'ही' राज्यं ठरली अग्रेसर रशियामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 2,26,353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यूरोपमधील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांनी 30 ऑक्टोबरपासून एक आठवड्याचा अवकाश घोषित करण्याचा सल्ला दिला आहे. कारण ३० ऑक्टोबरपासून सात दिवसात ४ दिवस सरकारी सुट्ट्या आहेत. या प्रस्तावाला राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची मंजुरी मिळणं बाकी आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: