Home /News /coronavirus-latest-news /

लहान मुलांच्या लसीकरणाविषयी मोठी बातमी! COVOVAX ला या महिन्यात मिळणार मान्यता

लहान मुलांच्या लसीकरणाविषयी मोठी बातमी! COVOVAX ला या महिन्यात मिळणार मान्यता

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली लहान मुलांची लस अखेर बाजारात उपलब्ध (Vaccine for kids likely to get approval in February says CEO Poonawala) होण्याची वेळ जवळ आली आहे.

    पुणे, 20 ऑक्टोबर : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली लहान मुलांची लस अखेर बाजारात उपलब्ध (Vaccine for kids likely to get approval in February says CEO Poonawala) होण्याची वेळ जवळ आली आहे. लहान मुलांसाठी तयार केलेली Covovax ही लस फेब्रुवारी महिन्यात बाजारात उपलब्ध होऊ शकेल, अशी (Vaccine for kids from 2 to 5 years) घोषणा सीरम इन्स्टिट्यूट चे सीईओ अदार पूनावाला यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड लसीच्या संशोधन आणि वितरणावर दहा हजार कोटींचा खर्च केला असून लहान मुलांसाठीची ही लस मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लसीच्या निर्मितीचा प्रवास या लसीसाठी आपण ऍस्ट्राझेन्का कंपनीसोबत करार केला असून नेमकी कुठली लस कितपत प्रभावी ठरेल, हे अगोदर सांगणं कठीण असल्याचं ते म्हणाले. इतर लस उत्पादकांसोबतही आम्ही बोलत असून या लसींचं पॅकिंग आणि उत्पादन यासाठी काही ठिकाणी बोलणी सुरू असल्याचं ते म्हणाले. लस बनवणं आव्हानात्मक लहान मुलांसाठी लस तयार करणं, ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असल्याचं पूनावाला यांनी म्हटलं आहे. देशातील वेगवेगळ्या भागात लहान मुलांवर या लसीचे प्रयोग करण्यात आले असून त्याचे निष्कर्ष आणि नमुने जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवण्यात आले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर ही लस जगभर उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा त्यृनी केली आहे. लसीची मागणी नाही भारत सरकारने अद्याप या लसीसाठीची मागणी आपल्याकडे नोंदवली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारने मागणी नोंदविल्यानंतर याचे उत्पादन अधिक मोठ्या प्रमाणात केलं जाईल, असंही ते म्हणाले. हे वाचा- जबरदस्त! भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा: 'ही' राज्यं ठरली अग्रेसर लसीचा निर्यातीसाठी हवीये परवानगी भारतात लसीकरणाचा तुटवडा असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने लसींच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांसोबत केलेले करार पूर्ण करणं शक्य होत नसल्याचं पूनावाला यांनी म्हटलं आहे. भारतानं लसींची निर्यात करण्याची परवानगी आपल्याला द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान, नुकतेच भारत सरकारनेदेखील लसींच्या निर्यातीला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतातील लसीकरणाने नुकताच 100 कोटींचा आकडा पार केला आहे आणि भारत सरकारनं सीरम इन्स्टिट्यूटकडे दर महा वीस कोटी लसींची आगाऊ मागणी नोंदवली आहे.त्यामुळे भारतीयांची गरज पूर्ण झाल्यानंतर आता लसींच्या निर्यातीला सुरुवात होणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona, School children

    पुढील बातम्या