मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /दिलासादायक! राज्यात Corona रुग्णसंख्येत घट; मुंबईतील रिकव्हरी रेटही वाढला

दिलासादायक! राज्यात Corona रुग्णसंख्येत घट; मुंबईतील रिकव्हरी रेटही वाढला

मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात 218 नवे रुग्ण (Mumbai Corona Update) आढळले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात 218 नवे रुग्ण (Mumbai Corona Update) आढळले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात 218 नवे रुग्ण (Mumbai Corona Update) आढळले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई 10 ऑगस्ट : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases in Maharashtra) घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील चोवीस तासात राज्यात 4,505 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. याउलट रविवारी 5508 नवे रुग्ण समोर आले होते, तर 151 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात 218 नवे रुग्ण (Mumbai Corona Update) आढळले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. हाच आकडा रविवारी 332 नवे रुग्ण आणि 5 जणांचा मृत्यू असा होता.

बीएमसीच्या (BMC) एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की सोमवारी मुंबईत कोरोनाचे 218 नवे रुग्ण (Corona Cases in Mumbai) आढळले आहेत. तर, एप्रिलनंतर एका दिवसात सर्वात कमी आणि या महिन्यात दुसऱ्यांदा मृतांचा आकडा तीनवर आहे. त्यांनी सांगितलं, की सोमवारी 372 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर मुंबईत आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची (Recovered Corona Patients) संख्या वाढून 7,15,389 वर पोहोचली आहे. मुंबईतील सरासरी रिकव्हरी रेट 97 टक्के (Mumbai Recovery Rate) झाला आहे. त्यांनी सांगितलं, की या महिन्याच्या सुरुवातीपासून सोमवारसह तिसऱ्यांदा एका दिवसातील रुग्णसंख्या 300 पेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

नवं संशोधन : Flu ची लस करते कोरोनाचा धोका कमी

अधिकाऱ्यानं सांगितलं, की कोरोना चाचणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत आणि मुंबईत आतापर्यंत तब्बल 84,39,521 नमुने तपासण्यात आले आहेत. 2 ते 8 ऑगस्ट या काळात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ 0.04 टक्के होती. अधिकाऱ्यानं सांगितलं, की झोपडपट्टी आणि चाळ यासारख्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण क्षेत्रांची संख्या घटून केवळ एक झाली आहे. तर, सील केल्या गेलेल्या इमारतींची संख्या 45 आहे. 4 एप्रिलला मुंबईत सर्वाधिक 11,163 आणि 1 फेब्रुवारीला सर्वात कमी 328 रुग्ण नोंदवले गेले होते. तर, सर्वाधिक 90 मृत्यू 1 मे रोजी झाले होते.

भारतात लवकरच आणखी एक लस, Zydus Cadila ला मिळणार मंजुरी

सरकारी सूत्रांनी सांगितलं, की ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, अशा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याचा विचार सुरू आहे. याउलट ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे, तिथे नियम कायम राहतील.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Corona virus in india