नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : भारतात लवकरच झायडस कॅडिला (Zydus Cadila Vacccine) लसीला मंजुरी (Approval) मिळणार असून लहान मुलांसाठी (12-18 age group) उपलब्ध होणारी ही पहिली लस ठरू शकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Zydus Cadila लसीच्या आपत्कालीन वापराला याच आठवड्यात (this week) परवानगी मिळण्याची शक्यता असून भारतात उपलब्ध असणाऱ्या लसींमध्ये आणखी एका लसीची भर पडणार आहे.
12-18 वयोगटाची लस
Zydus Cadila ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठीदेखील प्रभावी असून पुढील दोन ते तीन आठवड्यांत ती या वयोगटासाठी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतात लहान मुलांसाठी उपलब्ध होणारी पहिली लस Zydus Cadila ठरू शकणार आहे. तर 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध होणारी ती भारतातील सहावी लस असेल. आतापर्यंत भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक – व्ही या लसींना मान्यता मिळालेली आहे. तर मॉर्डना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांच्या लसींनाही मंजुरी मिळाली असून लवकरच या लसी बाजारात उपलब्ध व्हायला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.
लसीकरणाला येणार वेग
भारत सरकारनं डिसेंबर 2021 पर्यंत सर्व भारतीयांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावत असल्याचं चित्र आहे. अनेक भागात 18 ते 45 वयोगटासाठीची लस सरकारी व्यवस्थेत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. 45 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना खासगी हॉस्पिटल्समध्ये लसी मिळत असल्या तरी त्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे मोजावे लागत आहेत.
हे वाचा -डेल्टाहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांच मत
नव्या कंपन्यांसोबत होणाऱ्या करारामुळे देशातील लसींची उपलब्धता वाढणार असून लसीकरणाचा वेग वाढायला मदत होणार आहे. मात्र कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात तयार होणाऱ्या लसी वगळता इतर लसी मात्र खासगी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.