मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मुंबई-पुण्यातील 'या' ठिकाणी जाणं टाळा; आता इथं आहे कोरोनाचा सर्वात जास्त धोका

मुंबई-पुण्यातील 'या' ठिकाणी जाणं टाळा; आता इथं आहे कोरोनाचा सर्वात जास्त धोका

मुंबई-पुण्याला कोरोना पुन्हा आपल्या विळख्यात घेतो आहे.

मुंबई-पुण्याला कोरोना पुन्हा आपल्या विळख्यात घेतो आहे.

मुंबई-पुण्याला कोरोना पुन्हा आपल्या विळख्यात घेतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 17 फेब्रुवारी :  देशातील कोरोना रुग्णांची (Coronavirus in india) संख्या घटली असली तरी महाराष्ट्राची (coronavirus in maharashtra) परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबई (mumbai coronavirus), पुण्यात कोरोनानं (pune coronavirus) सर्वाधिक थैमान घातलं होतं. अथक प्रयत्नांनंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई-पुण्याला यश मिळालं होतं. गेले काही दिवस रुग्ण संख्या कमी झाली होती पण आता कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. दोन्ही ठिकाणी आता कोरोनानं आपले नवे हॉटस्पॉट्स बनवले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यातील मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या दोन्ही आठवड्यातील आकडेवारीची तुलना करता मुंबईतील 6 वॉर्डात 40 ते 50 टक्के कोरोनाग्रस्त वाढले आहेत. या विभागात सर्वाधिक रुग्ण ए वॉर्ड म्हणजेच व्हीआयपी वॉर्ड असलेल्या भागात सर्वात जास्त रुग्ण आर उत्तर म्हणजे दहिसर - 58 एम पश्चिम म्हणजे चेंबूर - 51 आर दक्षिण म्हणजे कांदिवली, मालाड  - 46 डी वॉर्ड म्हणजेच मलबार हिल, ग्रांट रोड - 42 एस वॉर्ड म्हणजे भांडुप - 51 मुंबईत कोरोनाचा धोका वाढत असल्याचे संकेत मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट जानेवारीत 3 टक्क्यांपेक्षा कमी होता, जो फेब्रुवारीत गेल्या आठवड्यात 3.2 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आला आणि आता 4.22 टक्क्क्यांवर पोहोचला आहे. तसंच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाला आहे. म्हणजे कमी दिवसात दुप्पट रुग्ण दिसू लागले आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी  1 फेब्रुवारीला 564 दिवस होता जो 16 फेब्रुवारीला 44 दिवस झाला आहे. दररोज रुग्णवाढीचा दरही वाढला आहे. 1 फेब्रुवारीला हा दर 0.12 टक्के होता जो 16 फेब्रुवारीला 0.16 टक्के झाला आहे. शिवाय आठवड्यातील संक्रमणाचं प्रमाणही वाढलं आहे. हे वाचा - मुंबईकरांनो, लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियम मोडले तर होईल गुन्हा दाखल लॉकडाऊनमध्ये सूट, कोरोना नियमांचं उल्लंघन आणि सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करणं याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत.  राज्यात नागरिकांना प्रवासात देण्यात आलेली मुभा आणि नागरिकांकडून नियम पाळण्यात होत असलेला हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत असल्याचं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर काही डॉक्टरांनी मात्र मुंबईत कोरोनाची दुसरी लाट तर आली नाही ना, अशी भीती व्यक्त केली आहे. पण ही दुसरी लहर आहे, असं म्हणणं आता घाईचं होईल, असं प्रशासनानं सांगितलं आहे. पुण्यातही परिस्थिती चिंताजनक गेले काही दिवस पुण्यातील कोरोना (Pune coronavirus) रुग्णांची आकडेवारीही कमी झाली होती. पुणेकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. कोरोना रुग्णांची कमी होणारी ही संख्या पाहून पुणेकरांनादेखील दिलासा मिळाला. पण हा दिलासा तात्पुरताच होता. कारण आता पुण्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुणेकरांना आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. पुण्यातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. जुन्या हॉटस्पॉटमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण कोरोनाने आपले नवे हॉटस्पॉट तयार केले आहेत आणि या नव्या हॉटस्पॉटमध्ये झपाट्यानं रुग्ण वाढत आहेत. सिंहगड परिसरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सिंहगड परिसर - 44 रुग्ण बिबवेवाडी - 39 रुग्ण नगररोड - वडगाव शेरी - 37 रुग्ण वारजे - कर्वेनगर - 36 रुग्ण हडपसर- मुंढवा - 33 रुग्ण कोथरूड - बावधन -  27 रुग्ण ढोले पाटील रोड - 11 रुग्ण राज्यात काय आहे स्थिती? मंगळवारच्या आकडेवारीनुसार राज्यात 3 हजार 663 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे, तर 2 हजार 700 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 19 लाख 81 हजार 408 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.66 टक्के एवढे झालं आहे. हे वाचा - पुण्यात नवे CORONA HOTSPOTS; पुणेकरांनो सांभाळा नाहीतर... राज्यात 39 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,53,96,444 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20,71,306 (13.45टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात एकूण 37 हजार 125 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
First published:

Tags: Corona hotspot, Coronavirus, Lifestyle, Maharashtra, Mumbai, Pune

पुढील बातम्या