मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Coronavirus: कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आता दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा

Coronavirus: कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आता दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा

शुक्रवारची रुग्णसंख्या (Coronavirus Latest Update) समोर आली असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी चोवीस तासात देशात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली 01 मे : कोरोनामुळे (Coronavirus) देशात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्येत आणखी किती वाढ होणार, याबद्दल काहीही अंदाज नाही. अशात आता शुक्रवारची रुग्णसंख्या (Coronavirus Latest Update) समोर आली असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी चोवीस तासात देशात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 57 हजार 094 इतकी झाली आहे. यासोबतच देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही 32 लाखाहून अधिक झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे 3522 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कोरोनानं आतापर्यंत जीव गमावलेल्यांची संख्या 2,11,836 वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही सातत्यानं वाढ होत आहे. ही संख्या आता 32,63,966 वर पोहोचली आहे. एकूण बाधितांच्या संख्येत हा आकडा 16.90 टक्के इतका आहे. रिकव्हरी रेट घटून 81.99 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनातून 1,56,73,003 लोक बरे झाले आहेत. तर, मृत्यूदर 1.11 टक्के आहे.

Positive News : हृदयात गंभीर बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बालकाने कोरोनाला हरवलं

आतापर्यंत 2,11,835 जणांचा मृत्यू -

मागील चोवीस तासात 3521 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 828 रुग्ण महाराष्ट्रातील, 375 दिल्ली, 332 उत्तर प्रदेश, 217 कर्नाटक, 269 छत्तीसगड, 173 गुजरात, राजस्थान 155, झारखंड 120, पंजाब 113 आणि तमिलनाडूमधील 113 जणांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत झालेल्या एकूण 2,11,835 मृत्यूंपैकी 68,813 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

भारतातून येणाऱ्या प्रवाशांना नो एन्ट्री, कोरोना प्रसारादरम्यान अमेरिकेचा निर्णय

देशात एका दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी 73.05 टक्के रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह दहा राज्यांमधील आहेत. यात कर्नाटक, केरळ, छत्तीसगढड, पश्चिम बंगाल, तमिलनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus